भारतीय महिला संघाचा सिंगापूरवर दणदणीत विजय

पीटीआय
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

काकामिघहारा (जपान) - भारतीय पुरुष संघाने आशिया करंडक विजेतेपद मिळवल्यानंतर आता महिला संघानेदेखील दणदणीत विजयी सलामी दिली. शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने सिंगापूरचा १०-० असा पराभव केला.

भारताकडून नवनीत कौर, राणी, नवज्योत कौर यांनी प्रत्येकी दोन; तर लालरेसिआमी, दीप ग्रेस एक्का, गुरजित कौर आणि सोनिका यांनी प्रत्येकी एकेक गोल नोंदवला.

आक्रमक सुरुवात करणाऱ्या भारतीय महिलांनी पहिल्या सत्रातच सुरुवातीला झटपट पेनल्टी कॉर्नर मिळवून आपले इरादे स्पष्ट केले. पहिल्या १५ मिनिटांतच भारताने २-० अशी आघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात भारतीयांच्या आक्रमणाला अधिक धार आली आणि सिंगापूरचा बचाव साफ ढेपाळला. या सत्रात आणखी चार गोल नोंदवून भारताने विश्रांतीलाच ६-० अशी मोठी आघाडी मिळवली.

उत्तरार्धातही भारतीय महिलांचा जोर कायम होता. त्यांनी सिंगापूरला आपला खेळ दाखवण्याची साधी संधीही मिळू दिली नाही. भारताने १०-० अशी आघाडी मिळवल्यावर अखेरच्या १५ मिनिटांत त्यांनी लागापोठ पेनल्टी कॉर्नर मिळवण्याचा सपाटा लावला.