आशियाई इनडोअर गेम्समध्ये कबड्डीची तांत्रिक पकड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

मुंबई - अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेत कबड्डीचा समावेश नसल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला; मात्र आशियाई ऑलिंपिक परिषदेच्या नियमामुळे कबड्डीची या स्पर्धेतील सहभागापूर्वीच तांत्रिक पकड झाली आहे. 

आशियाई इनडोअर आणि मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धा १७ सप्टेंबरपासून ॲश्‍गबात (तुर्कमेनिस्तान) येथे सुरू होतील. मूळच्या सोव्हिएत संघराज्यातील या देशात होणाऱ्या या स्पर्धेत २१ क्रीडाप्रकारात चुरस असेल. २७ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत ६५ देशांतील सहा हजार क्रीडापटू सहभागी होत आहेत. मात्र यात कबड्डीचा समावेश नाही.

चार वर्षांपूर्वी झालेल्या या स्पर्धेत भारताचा थेट सहभाग नव्हता. भारतीय ऑलिंपिक संघटनेवर बंदी असल्यामुळे भारतीय खेळाडू स्वतंत्रपणे सहभागी झाले होते. त्यात कबड्डीचा समावेश होता. भारतीय खेळाडूंनी पुरुष; तसेच महिलांचे सुवर्णपदक जिंकले होते; पण आशियाई ऑलिंपिक परिषदेने प्रत्येक खेळासाठी आशियातील दोनच स्पर्धा ठेवल्या आहेत. एक प्रकारचा खेळ केवळ आशियाई, आशियाई बीच किंवा आशियाई इनडोअर यापैकी दोनच स्पर्धांत असेल. अन्य खेळांनी यासाठी काही बदल केले आहेत. आता बास्केटबॉल थ्री बाय थ्री आहे; तर बेल्ट रेस्टलिंग आहे. फुटसाल आले; तसेच शॉर्ट कोर्स स्विमिंग अशा स्पर्धा करीत बदल केले; पण कबड्डीकडे असा कोणताच पर्याय नाही. त्यामुळे कबड्डीने इनडोअर स्पर्धेपासून दूर राहण्याचे ठरवले.