भारत-श्रीलंका आज पाचवी वनडे

पीटीआय
रविवार, 3 सप्टेंबर 2017

कोलंबो - भारतीय संघासमोर पुरता हतबल झालेला श्रीलंकेचा संघ सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तर भारतीय संघाने कसोटी मालिका ३-० अशी जिंकल्यानंतर आता एकदिवसीय मालिका ५-० अशी जिंकून दुहेरी व्हॉइटवॉश देण्याच्या तयारीत आहे.

भारताने फलंदाजीत बदल केले नसले, तरी गोलंदाजीत प्रमुख खेळाडूंना अगोदरच विश्रांती दिलेली आहे. अश्‍विन-जडेजा यांच्याऐवजी अक्षर पटेल-कुलदीप ही दुसरी फळीही श्रीलंकेच्या फलंदाजांना जड जात आहे. उमेश यादव, महम्मद शमी, तसेच भुवनेश्‍वर कुमार यांच्याऐवजी खेळणारे जसप्रित बुमराह आणि नुकतेच पदार्पण केलेल्या शार्दुल ठाकूर यांचा वेगवान मारा श्रीलंकेला कठीण जात आहे.