महिलांचा फुटबॉल सामना आज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

मुंबई - जागतिक फुटबॉल महासंघाच्या नियमावलीमुळे भारतीय महिला संघाची मलेशियाविरुद्धची शनिवारची लढत रद्द करण्यात आली. मात्र दोन संघांतील सोमवारची लढत निश्‍चित कार्यक्रमानुसार होणार आहे. 

मुंबई - जागतिक फुटबॉल महासंघाच्या नियमावलीमुळे भारतीय महिला संघाची मलेशियाविरुद्धची शनिवारची लढत रद्द करण्यात आली. मात्र दोन संघांतील सोमवारची लढत निश्‍चित कार्यक्रमानुसार होणार आहे. 

महिला फुटबॉल संघ चार वर्षांतील पहिल्या मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय लढतीसाठी मलेशियात दाखल झाला. दोन संघांत शनिवारी, तसेच सोमवारी लढती घेण्याचे ठरले होते, पण जागतिक महासंघाच्या नियमानुसार दोन मित्रत्वाच्या लढतीत दोन दिवसांचा ब्रेक आवश्‍यक आहे. मलेशिया फुटबॉल संघटनेच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी शनिवारची लढत रद्द करण्याचे ठरवले. दरम्यान, भारतीय महिला संघ उद्याच्या या लढतीत आपला ठसा उमटवण्यास उत्सुक आहे. ही लढत भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होणार आहे.

टॅग्स