इट्स सिम्पल, परीक्षेपेक्षा वर्ल्डकप लढत सोपी

इट्स सिम्पल, परीक्षेपेक्षा वर्ल्डकप लढत सोपी

मुंबई - परीक्षा कठीण की विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील लढत. १७ वर्षांखालील स्पेन संघातील खेळाडू एकमताने फुटबॉल लढत सोपी असल्याचे सांगतात. एवढेच नव्हे तर सामन्यात तुम्हाला हवे ते करता येते, हे स्वातंत्र्य परीक्षेत नसते, असेही ते सांगतात.

विश्‍वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेसाठी भारतात आलेल्या संघातील प्रत्येक खेळाडू रोज किमान एक तास अभ्यास करीत आहे. त्यासाठी स्पेन संघव्यवस्थापनाने ही जबाबदारी सहायक मार्गदर्शक डेव्हिड गौर्डो यांच्याकडे सोपवली आहे. 

खेळाडूंचे वय बघता त्यांनी सतत शिकायलाच हवे. त्यात केवळ फुटबॉल नव्हे तर सर्वंकष शिक्षणही आलेच. संघातील सर्व खेळाडूंना अभ्यासाचे वेळापत्रक पार पाडावेच लागते, असे गौर्डो सांगतात. 

विश्‍वकरंडकासारखी स्पर्धा सुरू असताना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे अवघड जाते; पण पर्याय काय? अभ्यास केला नाही, तर त्यात खूपच मागे पडू, असेही हे खेळाडू सांगतात. आम्ही जवळपास एकाच स्टॅंडर्डमध्ये आहोत; तसेच सगळ्यांचे  विषयही जवळपास सारखेच आहेत. त्यामुळे ग्रुप स्टडीज होत असते, असेही अनेकांचे मत आहे. त्यातील बहुतेकांसाठी स्पॅनिश लिटरेचर हा विषय सर्वांत कठीण आहे. तो समजण्यास खूपच अवघड आहे, असेही ते सांगतात.  

अभ्यास आणि फुटबॉल
परीक्षेपूर्वीचे आणि सामन्यापूर्वीचे टेन्शन सारखेच असते
परीक्षा तसेच सामन्याच्या वेळी सारखीच एकाग्रता लागते
अभ्यासात काही वेळा काही गोष्टी पाठच कराव्या लागतात. फुटबॉलमध्येही चाल रचताना सहकाऱ्यांची नेमकी जागा कोणती? हे कायमचे लक्षात घ्यावे लागते
व्यावसायिक फुटबॉलपटूत कमालीची स्पर्धा असते, त्यामुळे बॅकअप प्लॅन हवाच
व्यावसायिक फुटबॉलपटू झालोच तरी ती कारकीर्द फार तर १०-१५ वर्षांची असते. त्यानंतर अभ्यासच उपयोगी पडतो
अभ्यासाचे नीट टाइमटेबल केले की तीच शिस्त खेळातही येते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com