हरित नोहसाठी राष्ट्रीय यश दृष्टिपथात

हरित नोहसाठी राष्ट्रीय यश दृष्टिपथात

इंदूर - हरित नोहने एमआरएफ मोग्रीप राष्ट्रीय सुपरक्रॉस मालिकेतील विजेतेपद जवळपास नक्की केले आहे. इंदूरच्या फेरीत प्रकाशझोतात त्याने दोन्ही मोटो जिंकत नजीकचा प्रतिस्पर्धी सी. डी. जीनन याच्यावर मात केली. सर्वोत्तम रायडरचा किताबही हरितने मिळविला.

आंतरराष्ट्रीय गटात अलेक्‍झांडर टोन्कोवने दोन्ही मोटो जिंकले. ज्युनियर गटात पुण्याच्या युवराज कोंडेदेशमुखने दोन्ही मोटो जिंकले. या फेरीत आंतरराष्ट्रीय रायडरच्या जोडीला स्टंटही झाले. २० वर्षांत इंदूरला प्रथमच अशी स्पर्धा झाली, त्यामुळे प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला, , असे मालिकेचे प्रवर्तक गॉडस्पीडचे संस्थापक संचालक श्‍याम कोठारी यांनी सांगितले. 

सविस्तर निकाल  
क्‍लास १ ः हरित नोह (टीव्हीएस आरटीआर, टीव्हीएस रेसिंग, मोटो १- २०, मोटो २- २०, एकूण- ४०), सी. डी. जीनन (केएक्‍स २५० एफ, त्रिचूर, १३, १७, ३०), ई. एस. साजीत (केएक्‍स २५० एफ, त्रिचूर, १७, १३, ३०), ऋग्वेद बारगुजे (टीव्हीएस आरटीआर ३००, टीव्हीएस रेसिंग, १२, १५, २७), जावेद शेख (कावासाकी केएक्‍स २५० एफ) क्‍लास ९ आंतरराष्ट्रीय ः अलेक्‍झांडर टॉन्कोव (रशिया, केटीएम ३५०, २०, २०, ४०), टॉड बॅनिस्टर (अमेरिका, टीव्हीएस आरटीआर, १७, १७, ३४), अलेक्‍झांडर इव्हानयुतीन (रशिया, टीव्हीएस आरटीआर, १५, १३, २८), ४) शॉन यारबरो (अमेरिका, टीव्हीएस आरटीआर, ८, १५, २३), ५) डेव्हिड पुली (अमेरिका, केटीएम ३५०, १३, १०, २३). क्‍लास २  ः एम. कालीमोहन, इम्रान पाशा, व्ही. एम. महेश. क्‍लास ४- ः नरेंद्र पवार, सय्यद असिफ अली, निहार कटारिया.  क्‍लास ५ ः इम्रान पाशा, व्ही. एम. महेश, जगदीश कुमार. क्‍लास ६ ः वैयक्तिक टू- ४ स्ट्रोक २६० सीसीपर्यंत ः १) व्ही. एम. महेश (इम्पल्स, त्रिचूर, २०), जगदीश कुमार (इम्पल्स, कोईमतूर, १७), नरेंद्र पवार (इम्पल्स, इंदूर, १५). क्‍लास ७ ः २-४ २५० पासून ५०० सीसीपर्यंत ः ई. एस. साजित (केएक्‍स २५०, त्रिचूर, २०, २०, ४०), अदनान अहमद (वायझेड १२५, मंगळूर, १७, १७, ३४),एम. एस. प्रिन्स (यामाहा वायझेड २५०, दिल्ली, १३, १५, २८). क्‍लास ८  ः युवराज कोंडेदेशमुख (केटीएम एसएक्‍स ८५, पुणे, २०), करण कारले (सीआरएफ १५०, पुणे, १७), आदिल कॉरेया (कावासाकी केएक्‍स १००, केरळ, १५), इक्षण शानबाग (केटीएम ६५, सातारा, १२),सार्थक चव्हाण (केएक्‍स १००, पुणे, १२). 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com