भारताला पाच पदकांची आशा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मुंबई - भारतीय कुस्ती संघाला सोमवारी सुरू होणाऱ्या जागतिक स्पर्धेत चार ते पाच पदकांची आशा आहे. ही पदके प्रामुख्याने फ्रीस्टाईल प्रकारातच अपेक्षित आहेत. ही स्पर्धा पॅरिसला शनिवारपर्यंत होणार आहे.

आम्ही या स्पर्धेच्या १० दिवसआधीच पॅरिसला दाखल झालो आहोत. वातावरणाशी चांगले जुळवून घेतले आहे. सरावही चांगला होत आहे. सरावातील कामगिरी पाहिली, तर आम्हाला नक्कीच पाच पदकांची आशा आहे, असे भारतीय कुस्ती संघाचे मार्गदर्शक कुलदीप सिंग यांनी सांगितले. 

रिओ ऑलिंपिकनंतर एका वर्षातच ही स्पर्धा होणार आहे, तरीही ती तेवढीच खडतर असेल. कोणीही, कधीही जागतिक स्पर्धेला कमी लेखत नाही. या स्पर्धेतील यश महत्त्वाचे असते. आम्हाला ग्रीको रोमनपेक्षा फ्रीस्टाईल प्रकारातच पदकाची आशा आहे. महिला कुस्तीगिरांचीही कामगिरी चांगली होत आहे. स्पर्धा काही तासांवर असताना पदक कोण जिंकेल? कोणाकडून जास्त आशा आहेत, याबाबत टिप्पणी करणे अयोग्य होईल, असेही त्यांनी सांगितले. 

भारतीय संघ - महिला - ४८ किलो - विनेश फोगट. ५३ किलो - शीतल. ५५ किलो - ललिता. ५८ किलो - पूजा धांदा. ६० किलो - साक्षी मलिक. ६३ किलो - शिल्पी. ६९ किलो - नवजोत कौर. ७५ किलो - पूजा. फ्रीस्टाईल - ५७ किलो - संदीप तोमर. ६१ किलो - हरफूल. ६५ किलो - बजरंग. ७० किलो - अमित धनकर. ७४ किलो - प्रवीण राणा. ८६ किलो - दीपक. ९७ किलो - सत्यव्रत काडियन. १२५ किलो - सुमीत.  ग्रीको रोमन - ५९ किलो - ग्यानेश्वर. ६६ किलो - रवींदर. ७१ किलो - योगेश. ७५ किलो - गुरप्रीत सिंग. ८० किलो - हरप्रीत सिंग. ८५ किलो - रवींदर खत्री. ९८ किलो - हरदीप. १३० किलो - नवीन. 

भारताचे आव्हान बजरंगपुरतेच?
जागतिक कुस्ती महासंघाच्या अधिकृत संकेतस्थळानुसार भारताच्या केवळ बजरंगलाच पदकाची आशा आहे. तो फ्रीस्टाईलच्या ६५ किलो गटात सहभागी आहे. रिओतील सर्वोत्तम सहांचा सहभाग नाही. बजरंगने नुकतीच आशियाई स्पर्धा जिंकली आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.