भारत-पाकिस्तान एकाच गटात

भारत-पाकिस्तान एकाच गटात

पुणे - प्रो-कबड्डीच्या माध्यमातून एकत्र खेळणारे आशियातील खेळाडू आता आशियाई स्पर्धेत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. स्पर्धेला शुक्रवार (ता. २४) पासून इराणमधील गोरगन शहरात सुरवात होत आहे. प्रत्येक आघाड्यांवर पारंपरिक प्रतिस्पर्धी असणारे भारत आणि पाकिस्तान एकाच गटात समावेश आहेत. 

एकूण १० देशांचे संघ सहभागी होत असून, दोन गटांत विभागण्यात आले आहे. पुरुष विभागातील गट रचना आणि सहभागी संघांचा अनुभव लक्षात घेता भारत, पाकिस्तान, इराण, कोरिया हे चार संघ उपांत्य फेरीपर्यंतची वाटचाल निश्‍चित मानल्यास आश्‍चर्य वाटू नये. महिला विभागातही भारत आणि इराण संघांचेच पारडे जड राहणार असून, नव्या दमाच्या भारतीय संघासमोर थायलंडचे तगडे आव्हान राहण्याची शक्‍यता आहे.  भारतीय पुरुष संघाची सलामी इराकशी होणार असून, दुसरे दिवशी त्यांना तीन सामने खेळायचे आहेत. सकाळच्या सत्रात अफगाणिस्तान आणि संध्याकाळी जपान आणि पाकिस्तानशी त्यांचे सामने होणार आहेत. महिला संघ पहिल्याच दिवशी दोन सामने खेळेल. सकाळच्या सत्रात तैवान, तर संध्याकाळच्या सत्रात त्यांचा सामना थायलंडशी होईल. त्यानंतर दुसरे दिवशी भारतीय संघ तुर्कमेनिस्तान आणि कोरियाशी खेळेल. दोन्ही गटातील पहिले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचे सामने रविवारी (ता. २५) सकाळी, तर अंतिम फेरीचे सामने संध्याकाळच्या सत्रात होतील. 

आशिया क्रीडा स्पर्धेची पूर्वतयारी करण्याच्या इराद्यानेच आम्ही या स्पर्धेचे आयोजन करत आहोत. प्रत्येक संघाला आशियाई स्पर्धेच्या दृष्टिने आपली तयारी तपासून बघता येईल. भारताविरुद्ध खेळताना सर्वच संघांचा कस लागतो. त्यामुळेच सर्व संघांसाठी ही लढत महत्त्वाची असेल.
-महंमद रेझा मॅघसोदिओ, इराण कबड्डी संघटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com