‘आयओए’ घेणार विशेष सभा

‘आयओए’ घेणार विशेष सभा

नवी दिल्ली - भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) आगामी निवडणुकीपूर्वी घडामोडींना वेग येत आहे. २९ नोव्हेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. अध्यक्ष आणि सरचिटणीस या दोन पदांच्या निवडीचे पात्रता निकष काय असावेत यावर चर्चा झडेल.

निवडणुकीसाठी १४ डिसेंबर ही तारखी ठरली आहे. विविध पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनपर्यंत असेल. विद्यमान अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी निवडणूक शर्यतीत नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरींदर बात्रा, विद्यमान खजिनदार आणि टेनिस संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल खन्ना हे इच्छुक असल्याची चर्चा आहे. खजिनदारपदासाठी तीन जण अर्ज भरण्याची शक्‍यता आहे.

आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी सांगितले की, चेन्नईत नऊ नोव्हेंबरला पार पडलेली कार्यकारिणीची बैठक तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडून (आयओसी) मिळालेल्या पत्रानुसार विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे.

आयओए घटनेच्या तरतुदीत २०१३ मध्ये बदल करण्यात आला. त्यानुसार कलम ११-१-क आणि कलम ३१-इ याविषयी चर्चा करून योग्य अर्थ काढणे हा विषयपत्रिकेवरील मुख्य मुद्दा आहे.

कलम ११-११- क नुसार आधीच्या कार्यकारिणीचे सदस्य असणे आणि पद भूषविणे अध्यक्ष व सरचिटणीसपदाच्या उमेदवारीसाठी बंधनकारक आहे.

कलम ३१- इनुसार घटनेचा अर्थ आणि ती लागू करण्याविषयी सर्व मुद्यांवर तसेच विषयपत्रिकेत समाविष्ट नसलेल्या मुद्यांवर सर्वसाधारण सभेचा निर्णय सर्वांवर बंधनकारक असेल.

बदलासाठी नव्हे; स्पष्टतेसाठी
सरचिटणीस मेहता यांनी सांगितले की, २०१४-१७च्या आधीच्या कार्यकारिणीत असलेले सदस्यसुद्धा दोन प्रमुख पदांसाठी उभे राहू शकतील.

या दोन पदांच्या पात्रता निकषाविषयीच्या कलमांमध्ये बदल करण्यासाठी नव्हे, तर त्यात सुस्पष्टता आणण्यासाठी ही सभा आमंत्रित केल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com