महाराष्ट्रला सर्वसाधारण विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

नागपूर - नागपूर जिल्हा ॲथलेटिक्‍स संघटना आणि महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्‍स संघटनेच्या संयुक्‍त विद्यमाने विभागीय क्रीडासंकुलातील सिंथेटिक ट्रॅकवर रविवारी पार पडलेल्या २९ व्या पश्‍चिम विभागीय ज्युनिअर ॲथलेटिक्‍स स्पर्धेत यजमान महाराष्ट्रच्या धावपटूंनी अपेक्षेप्रमाणे वर्चस्व गाजवून सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी बजावणारी महाराष्ट्रची आंतरराष्ट्रीय धावपटू चैत्राली गुजर हिने मुलींच्या गटात उत्कृष्ट खेळाडूंचे पारितोषिक मिळविले. मुलांमध्ये महाराष्ट्रचाच किरण भोसले उत्कृष्ट खेळाडू ठरला.   

दोन दिवसीय स्पर्धेचा शेवटचा दिवस साताऱ्याची चैत्राली, नाशिकची दुर्गा देवरे आणि नागपूरकन्या निकिता राऊत यांनी गाजविला. महाराष्ट्राच्या या तिन्ही युवा धावपटूंनी प्रत्येकी दोन सुवर्णपदके जिंकून स्पर्धेवर आपली छाप पाडली. २० वर्षांखालील मुलींच्या गटात सहभागी चैत्रालीने शंभर मीटरपाठोपाठ दोनशे मीटरमध्ये सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तिने ही शर्यत २४.८ सेकंदात पूर्ण केली. याच वयोगटात नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू दुर्गा देवरे हिने ८०० मीटर प्रकारात सुवर्ण पटकाविले. तिने दोन मिनिटे १६.१ सेकंद इतकी वेळ नोंदविली. दुर्गाने काल पंधराशे मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागपूरच्या निकिताने २० वर्षांखालील मुलींच्या तीन हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या शर्यतीत निकिताने शेवटच्या शंभर मीटरमध्ये जोरदार मुसंडी मारत दुहेरी सुवर्णपदकाला गवसणी घातली. निकिताने काल पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. नागपूरचा आणखी एक युवा धावपटू अजित बेंडेनेही तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्ण जिंकून उपस्थितांची मने जिंकली. 

स्पर्धेत ६८ सुवर्णांसह सर्वाधिक १५४ पदके जिंकणाऱ्या महाराष्ट्रने सर्वसाधारण विजेतेपदाचा करंडक पटकाविला. १६ सुवर्णपदकांची कमाई करणाऱ्या एएफआय-मध्य प्रदेश संघाने उपविजेतेपद मिळविले. महाराष्ट्रचे अनिल साहू व स्पृती माने यांनी ‘बेस्ट जंपर’, महाराष्ट्रचेच आदिनाथ भोसले व निकिता राऊत ‘बेस्ट एंड्युरन्स रनर’ चा बहुमान पटकाविला.

Web Title: sports news junior athletics competition