एकाच सामन्यात स्टार्कची दोनदा हॅटट्रिक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

सिडनी - ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने ॲशेस मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंडला धोक्‍याचा इशारा दिला. त्याने शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत एकाच सामन्यात दोन वेळा हॅटट्रिक करण्याची अनोखी कामगिरी केली. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात दोन हॅटट्रिक करणारा तो आठवा गोलंदाज ठरला आहे.

ऑस्ट्रेलियातील शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत स्टार्क न्यू साऊथ वेल्स संघातून खेळतो. त्याने हा पराक्रम पश्‍चिम ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला. पहिल्या डावांत त्याने जासन बेरहॅंडॉफ, डेव्हिड मूडी आणि सायमन मॅकिन यांना सलग तीन चेंडूवर बाद केले आणि कारकिर्दीतील आपली पहिली हॅटट्रिक केली. त्यानंतर स्टार्कने दुसऱ्या डावातील १५ व्या षटकांतील अखेरच्या दोन चेंडूंवर बेरहॅंडॉफ आणि मूडी यांना बाद केले. एकाच कसोटी सामन्यात दोन हॅटट्रिक करण्याचा ऑस्ट्रेलियाच्याच जिमी मॅथ्यूज यांचा विक्रम कायम आहे. १९१२ मध्ये मॅंचेस्टर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लेगस्पिनर मॅथ्युज यांनी हा विक्रम केला होता.