राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेस स्वप्नील धोपाडे पात्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मुंबई - स्वप्नील धोपाडेने एम. आर. ललित बाबूविरुद्धची लढत बरोबरीत सोडवून राष्ट्रीय प्रीमियर बुद्धिबळ स्पर्धेतील प्रवेश निश्‍चित केला. राष्ट्रीय चॅलेंजर स्पर्धेत अकराव्या फेरीअखेर स्वप्नीलचे ९.५ गुण आहेत. त्याने अन्य स्पर्धकांना एका गुणाने मागे टाकले आहे. स्पर्धेतील दोन फेऱ्या शिल्लक आहेत. त्यामुळे स्वप्नील राष्ट्रीय प्रीमियर स्पर्धेला पात्र ठरला. ललित बाबू, हिमांशू शर्मा, देबाशिष, दीपन यांचे प्रत्येकी ८.५ गुण आहेत.