व्यग्र कार्यक्रमात तंदुरुस्ती ठरणार महत्त्वाची - रमेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

पुणे - प्रो-कबड्डीच्या पाचव्या मोसमात नव्या चार संघांची भर पडल्यानंतर कार्यक्रम व्यग्र झाला असून, खेळाडूंची तंदुरुस्ती निर्णायक ठरणार असल्याचे मत पुणेरी पलटण संघाचे प्रशिक्षक बी. सी. रमेश यांनी व्यक्त केले. 

प्रो-कबड्डीच्या पाचव्या मोसमासाठी बुधवारी पुणेरी पलटणच्या अधिकृत जर्सीचे अनावरण करण्यात आले. या मोसमात दीपक हुडा पुणे संघाचे नेतृत्व करणार आहे. या वेळी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश कांडपाल, प्रशिक्षक बी. सी. रमेश उपस्थित होते.

या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना प्रशिक्षक रमेश यांनी एकूणच नियोजनाची माहिती देताना तंदुरुस्तीला महत्त्व राहील, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘नव्या दमाच्या खेळाडूंसह अनुभवी खेळाडूंचा समावेश असल्यामुळे संघात समतोल साधला गेला आहे. आतापर्यंत पुणे संघ उपांत्य फेरीपर्यंत पोचूनही मागे रहात होता. त्याचा अभ्यास करून या वेळी आम्ही परिस्थितीनुसार खेळात कसा बदल करायचा यावर अधिक भर दिला आहे. त्याचवेळी कार्यक्रम व्यग्र असल्यामुळे तंदुरुस्तीवर अधिक भर दिला आहे. त्यासाठी विशेष उपक्रम आम्ही राबवले आहेत. सामन्यांची वाढलेली संख्या आणि उपलब्ध खेळाडू लक्षात घेता संघ निवडण्यासाठी आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे देखील एक प्रकारची लवचिकता या वेळी बघायला मिळेल.’’

कर्णधारपदाची माळ गळ्यात पडल्यामुळे जबाबदारी वाढल्याची भावना कर्णधार दीपक हुडा याने व्यक्त केली. तो म्हणाला, ‘‘कर्णधारपदाच्या नव्या जबाबदारीमुळे निश्‍चितच दडपण वाढले आहे. मात्र, खेळण्याचा अनुभव असल्यामुळे त्यावर मात करण्याची क्षमता बाळगून आहे. प्रशिक्षक रमेश सर आणि मेंटॉर अशोक शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे या वेळी आम्ही आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी  सज्ज आहोत.’’ 

पाचव्या मोसमात पुणे संघाने नियामानुसार दीपक हुडा या एकमात्र खेळाडूला कायम ठेवले. त्याविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश खंडपाल म्हणाले, ‘‘या संघाप्रमाणे गेल्यावर्षीचा संघही प्रतिभावान होता. त्यामुळे नियमानुसार एकाच खेळाडूची निवड करताना खूप कठिण गेले. या वर्षी देखील सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आम्ही  कटिबद्ध आहोत.’’