गोपीचंदची चहुबाजूंनी कोंडी करण्यास सुरुवात

पीटीआय
मंगळवार, 13 जून 2017

मुंबई / नवी दिल्ली - पुल्लेला गोपीचंद यांना मुख्य राष्ट्रीय मार्गदर्शक म्हणून कायम ठेवतानाच त्यांची चहुबाजूंनी कोंडी करण्यास सुरुवात झाली आहे. विविध गटासाठी मुख्य मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात येत आहे, त्याचबरोबर गोपीचंद यांच्याकडून परस्परविरोधी हितसंबंध नियमाचा भंग होत असल्याचाही आक्षेप घेतला जात आहे.

भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या रविवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत गोपीचंद यांना मुख्य मार्गदर्शक पदावरून हटवण्यात येईल अशी चर्चा होती, पण गोपीचंद यांना या पदावर कायम ठेवण्यात आले, पण कुमार गट तसेच दुहेरीसाठी स्वतंत्र मार्गदर्शक नेमण्याचा निर्णय झाला. 

कुमार गटाची सूत्रे संजय मिश्रा यांच्याकडे येतील; तर दुहेरीची सूत्रे गोपीचंद यांची विरोधक ज्वाला गुत्ता हिच्याकडे जातील अशी चिन्हे आहेत. या मुख्य प्रशिक्षक निवड समितीत गोपीचंद यांचा समावेश करून बॅडमिंटन संघटनेने त्यांना दिलासा दिला.

परस्परहितसंबंधाचा मुद्दा लांबणीवर पडला असला, तरी यावरून आगामी काही महिन्यांत वाद होतील अशी चिन्हे आहेत. राष्ट्रीय तसेच राज्य मार्गदर्शक, तांत्रिक पदाधिकारी राज्य अथवा राष्ट्रीय संघटनेच्या कार्यकारिणीत नसतील, तसेच राष्ट्रीय निवड समिती सदस्यांची खासगी अकादमी असू नये असा नियमही करण्यात येत आहे.

गोपीचंद तेलंगणा संघटनेचे सचिव आहेत, यांचा या प्रस्तावास आक्षेप नाही; मात्र त्यांनी याची सर्व स्तरावर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर देशात खासगी अकादमीच बॅडमिंटनपटू घडवत आहे याकडे लक्ष वेधले. या खेळात फारसे यश मिळत नसताना परस्पर हितसंबंधांचा मुद्दाही चर्चेत नव्हता, आता खेळास ग्लॅमर लाभल्यावर अनेक जण या खेळात सक्रीय झाले आहेत.  याकडे मार्गदर्शक तसेच तांत्रिक पदाधिकारी लक्ष वेधतात.