सांघिक स्नूकरमध्ये पाकिस्तानला हरवून भारत जगज्जेता

सांघिक स्नूकरमध्ये पाकिस्तानला हरवून भारत जगज्जेता

डोहा (कतार) - भारताने जागतिक सांघिक स्नूकर स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर पिछाडीवरून थरारक विजय मिळविला. पंकजचे हे कारकिर्दीतील १९वे जागतिक विजेतेपद ठरले.

पंकज अडवानी आणि मनन चंद्रा यांच्या संघाने हे यश साकार केले. सर्वोत्तम पाच फ्रेमच्या लढतीत भारताने पहिल्या दोन फ्रेम गमावल्या होत्या. त्यानंतरही भारत तिसऱ्या फ्रेममध्ये ०-३० असा पिछाडीवर होता. त्यानंतर मनन याने ३९ गुणांचा उपयुक्त ब्रेक नोंदविला.

चौथ्या फ्रेममध्ये मग पंकजने लौकिकाला साजेसा खेळ केला. बाबर मसीह याच्याविरुद्ध तो १-२० अशा पिछाडीवर होता. मग त्याने टेबल क्‍लिअरींगचा धडाका लावत ६९ गुणांचा ब्रेक मिळविला. पंकजने ही फ्रेम जिंकल्यामुळे बरोबरी निर्माण झाली.

यानंतर मनन आणि महंमद असिफ यांच्यातील फ्रेमला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले. त्यात मननला आपली बाजू सुरक्षित करण्यासाठी हिरव्या चेंडूची गरज होती, तर असिफला अशक्‍यप्राय कोनातून तपकिरी चेंडू पॉट करायचा होता. ते शक्‍य नसल्यामुळे त्याने पराभव मान्य केला. भारताने उपांत्य फेरीत इराणला ३-२, उपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडला २-१, तर बाद फेरीत चीनला ३-२ असे हरविले होते. त्याआधी ब गटात भारताने आइसलॅंड आणि आयर्लंड २ या संघांना हरविले होते.

आम्ही ०-२ असे पिछाडीवर पडल्यामुळे पाकिस्तानचे पारडे जड झाले होते. आम्हाला विजयाची किंचितच संधी होती, पण दुहेरीतील विजयासह आम्ही आशा पल्लवित केल्या. आता आमच्या वैयक्तिक प्रयत्नांवर सारे काही अवलंबून होते. मनन याने उपांत्य आणि अंतिम फेरीत निर्णायक फ्रेममध्ये अप्रतिम खेळ केला. मला त्याच्या पहिल्या जागतिक विजेतेपदाचा आनंद वाटतो.
- पंकज अडवानी

निकाल
भारत विवि पाकिस्तान ३-२ (मनन चंद्रा पराभूत वि. बाबर मसीह २४-७३. पंकज अडवानी पराभूत वि. महंमद असिफ ५६-६१. मनन-पंकज विवि बाबर-महंमद ७२-४७. पंकज विवि बाबर १०६-२०. मनन विवि महंमद ५६-२०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com