शाळेत खेळ अनिवार्य होण्यासाठी उपक्रम

मुकुंद पोतदार
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

टाटाच्या ऑनलाइन याचिकेद्वारे जनजागृती मोहिमेला प्रतिसाद

पुणे - ऑलिंपिकमधील अपयशानंतर ‘पदक-बदक’ अशी सुरू झालेली चर्चा शाळेत खेळाचा अनिवार्य विषय म्हणून समावेश करण्यापर्यंत रंगते. प्रत्यक्षात शाळा-महाविद्यालय-विद्यापीठ अशा पातळ्यांवर खेळाची पीछेहाटच होत असल्याचे चित्र बहुतेक ठिकाणी दिसते. 

टाटाच्या ऑनलाइन याचिकेद्वारे जनजागृती मोहिमेला प्रतिसाद

पुणे - ऑलिंपिकमधील अपयशानंतर ‘पदक-बदक’ अशी सुरू झालेली चर्चा शाळेत खेळाचा अनिवार्य विषय म्हणून समावेश करण्यापर्यंत रंगते. प्रत्यक्षात शाळा-महाविद्यालय-विद्यापीठ अशा पातळ्यांवर खेळाची पीछेहाटच होत असल्याचे चित्र बहुतेक ठिकाणी दिसते. 

यात बदल घडावा म्हणून टाटा समूहाने एक उपक्रम आखला आहे. त्यासाठी एका ऑनलाइन याचिकेवर स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. टाटाचे विभागीय उपाध्यक्ष सुशांत दाश यांनी याविषयी अधिक माहिती दिली. या उपक्रमाला आतापर्यंत सुमारे पाच लाख लोकांनी प्रतिसाद दिला आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्याशी झालेला संवाद

‘जागो रे’ या उपक्रमाची कल्पना  कशी सुचली?
- टाटा समूहाने व्यावसायिक उद्दिष्ट्ये साध्य करताना सामाजिक उपक्रमांना नेहमीच पाठिंबा दिला आहे. २००७ मध्ये ‘जागो रे’ उपक्रम सुरू झाला तेव्हापासून भ्रष्टाचारला विरोधापासून महिलांची सुरक्षितता अशा अनेक विषयांवर मोहिमा राबविण्यात आल्या. समाजातील औदासीन्य कमी व्हावे आणि जनजागृतीद्वारे सक्रियता असा बदल घडविण्यावर भर होता. आम्हाला दिसून आले की एखादी दुर्घटना किंवा नकारात्मक प्रसंगानंतरच त्याविरुद्ध आवाज उठतो. अशावेळी आम्ही आढावा घेऊन ‘जागो रे’ उपक्रमात ‘बजने से पेहले जागो रे’ असा उपक्रम सुरू केला. त्यामुळे एखादा विषय मुळापासून सुरू करता येतो.

भारतात खेळाची सध्याची स्थिती कशी आहे?
- आजही आपल्याकडे बहुतेक खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील यशासाठी पुरेसा पाठिंबा नाही. रिओ ऑलिंपिकमधील अपयशानंतर पुन्हा चर्चेला उधाण आले. त्यानंतर भक्कम क्रीडासंस्कृतीचा अभाव असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. हौस म्हणून खेळ असाच मतप्रवाह आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळाचे मोठे योगदान असू शकते, हा मुद्दा ठसायला हवा. इतर विषयांच्या तुलनेत खेळाकडे ‘करिअर’चा सक्षम पर्याय म्हणून पाहिले जात नाही.

तुमच्या उपक्रमाचे नेमके  काय उद्देश आहेत?
- शाळेमध्ये खेळाचा अनिवार्य विषय म्हणून समावेश करण्यासाठी शासकीय पातळीवर धोरणात्मक बदल व्हायला हवा. तरच पायाभूत पातळीपासून क्रीडासंस्कृतीची पाळेमुळे रुजतील. पालकांनी आमच्या उपक्रमाला नुसताच पाठिंबा द्यावा असे आम्हाला वाटत नाही. हे करतानाच त्यांनी मुलांना किमान एक स्पर्धा पाहायला न्यावे, मग ती स्पर्धा शेजारच्या मैदानावर असली तरी चालेल. स्थानिक, राज्य किंवा राष्ट्रीय अशा कोणत्याही पातळीवरील स्पर्धेची रंगत मुलांनी स्वतः अनुभवायला हवी.
या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याची 

योजना कशी आहे?
- आम्ही वर्षाच्या प्रारंभी सुरवात केली. पहिल्या टप्प्यात अर्थपूर्ण सामाजिक बदलासाठी संवादाला चालना आणि त्यासाठी सक्रियता यावर भर होता. दुसऱ्या टप्प्यात आमच्या याचिकेवर स्वाक्षरी करणे अपेक्षित आहे. तिसऱ्या टप्प्यात आम्ही आणखी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी प्रत्यक्ष उपक्रम आखू.

असे व्हा सहभागी
‘बजने से पेहले जागो रे’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी खालील नंबरवर मिस्ड कॉल - ७८१५९ ६६६६६ संकेतस्थळ - www.jaagore.com