विदित गुजराथीचे २७०० एलो रेटिंग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

नाशिक - नाशिकचा ग्रँडमास्टर विदित गुजराथी याने २७०० एलो रेटिंगचा टप्पा पार केला आहे. ही माहिती विदितने स्वतः ट्विटरद्वारे जाहीर केली. अशी कामगिरी करणारा तो महाराष्ट्राचा पहिलाच बुद्धिबळपटू आहे. 

नाशिक - नाशिकचा ग्रँडमास्टर विदित गुजराथी याने २७०० एलो रेटिंगचा टप्पा पार केला आहे. ही माहिती विदितने स्वतः ट्विटरद्वारे जाहीर केली. अशी कामगिरी करणारा तो महाराष्ट्राचा पहिलाच बुद्धिबळपटू आहे. 

विश्‍वनाथन आनंद, के. शशिकिरण आणि पी. हरिकृष्णन यांच्यानंतर तो भारताचा चौथा बुद्धिबळपटू ठरला आहे. स्पेनमधील लीनारेस येथे झालेल्या स्पॅनिश सांिघक स्पर्धेत त्याने सॉल्वाय संघाचे प्रतिनिधित्व केले, विदितला पहिल्या पटावर खेळण्याचा मान मिळाला. त्या संधीचे सोने करत त्याने सात फेऱ्यांमध्ये ४.५ गुण मिळविले त्याची कामगिरी ८.७ एलो रेटिंगच्या तोडीची झाली. याबरोबरच त्याने २७०१ एलो रेटिंग गाठले. या संदर्भात संपर्क साधला असता विदित म्हणाला, की ही माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी अॅचिव्हमेंट आहे. यापूर्वीही मी दोन वेळा या टप्प्याच्या अगदी जवळ पोचलो होतो. एकदा तर अगदी २६९९ पर्यंत पोचलो होतो. त्यामुळे अखेर हा टप्पा गाठल्याचा आनंद मोठा आहे. हा टप्पा गाठल्यानंतर जबाबदारी वाढली असून, भविष्यात माझे डाव अधिकाधिक रंगतदार ठरतील या दृष्टीने माझे प्रयत्न राहतील.