टीव्ही प्रक्षेपणापासून महिला कबड्डी दूरच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

मुंबई - राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी थेट प्रक्षेपण होणार असले, तरी या थेट प्रक्षेपणाच्या झगमगाटापासून महिला कबड्डी दूरच राहणार आहे. संयोजक तसेच प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीने घेतलेल्या निर्णयानुसार केवळ पुरुषांच्या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण होईल, त्यामुळे महिला स्पर्धेचा कालावधीही बदलण्यात आला आहे.

संयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टार स्पोर्ट्‌सच्या एसएस फर्स्ट वाहिनीवरून या लढतींचे थेट प्रसारण होईल. त्यानुसार गुरुवारी पुरुषांच्या उपांत्यपूर्व लढती पासून प्रसारण होईल. महिलांच्या लढती उद्या (ता. ३)पासून सुरू होतील, तर अंतिम लढत सांगतादिनी दुपारी २.३० वाजता होईल.

गतवर्षी राष्ट्रीय महिला आणि पुरुष कबड्डी स्पर्धा वेगवेगळी झाली होती आणि त्यातील केवळ पुरुषांच्या स्पर्धेतील सांगता दिनाचे प्रक्षेपण झाले होते. आता महिला आणि पुरुषांची स्पर्धा एकत्र होत असूनही महिलांच्या लढतीचे प्रक्षेपण होणार नाही.

असा असेल कार्यक्रम
महिला लढती - उपांत्यपूर्व लढती ३ जानेवारीस सायं. ६ पासून. 
- ४ जानेवारीस महिला सामन्यांना सुटी
- उपांत्य फेरी ५ जानेवारीस सकाळी ११ पासून, अंतिम लढत दु. २.३० वा.
पुरुष - उप-उपांत्यपूर्व लढती ३ जानेवारीस
- उपांत्यपूर्व लढती ः (४ जानेवारी ) - सायं. ५.४५, ६.४५, ७.४५ आणि ८.४५ वा.
- उपांत्य लढती - (५ जानेवारी) सायं. ५.४५ वा., ६.४५ वा.  
- अंतिम लढत - रात्री ८.४५ वा.
(उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यापासून थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्‌सवरून)

Web Title: sports news women kabaddi Removing the women kabaddi from the TV broadcast