क्रीडा धोरण उपसमितीतून कुस्तीगीरांना वगळले

क्रीडा धोरण उपसमितीतून कुस्तीगीरांना वगळले

मुंबई - राज्य सरकारने क्रीडा धोरण उपसमितीतील संभाजी पवार आणि काका पवार या दोन्ही कुस्तीगीरांना आज दूर करून त्यांच्याऐवजी धनराज पिल्ले व रचिता मिस्त्री यांची निवड केली आहे; मात्र जुलैमध्ये स्थापन झालेल्या या समितीची पहिली बैठक कधी होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

क्रीडा विभागाने २९ जुलै रोजी ही समिती स्थापन केली होती. मुख्यमंत्री अध्यक्ष, तर क्रीडा व युवक कल्याणमंत्री हे सहअध्यक्ष असतील. दोन ‘अर्जुन’ व दोन ‘शिवछत्रपती’ पुरस्कारार्थी असे चार उपाध्यक्ष असतील, असे जाहीर करण्यात आले होते. 

उपाध्यक्ष संभाजी पवार यांच्याऐवजी धनराज पिल्ले, तर ‘अर्जुन’ पुरस्कारार्थींमध्ये काका पवार यांच्याऐवजी रचिता मिस्त्री यांचा समावेश झाला आहे. क्रीडा संघटकांत दिवंगत रामदास दरणे यांच्याऐवजी अमरावतीच्या अरुण खोडस्कर यांचा समावेश करण्यात आला आहे. आज केलेला बदल हा २९ जुलैच्या निर्णयाचे शुद्धिपत्रक असल्याचे शासनाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी म्हटले आहे. 

जवळपास पाच महिन्यांनी या अध्यादेशात बदल करण्यात आला आहे; पण या समितीची अद्याप एकदाही बैठक झालेली नाही. त्याचबरोबर आम्हालाही सरकारी निर्णयाच्या माहितीद्वारेच आपण या समितीत असल्याचे कळले असल्याचा दावा काही सदस्यांनी केला आहे. क्रीडा धोरणातील 

सर्व योजनांची कालबद्ध अंमलबजावणी करणे हा उद्देश आहे, असे सांगितले होते, तसेच या समितीच्या वर्षभरात किमान चार बैठका घेऊन क्रीडा धोरणाच्या फलश्रुतीचा आढावा घेण्यात येईल, असेही सांगितले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com