तुम्ही हरलात की आपण जेवण करू : जडेजा

ravindra jadeja
ravindra jadeja

तिसऱ्या दिवशीच्या खेळावर आपल्या अष्टपैलू कामगिरीची मोहोर उमटवणाऱ्या रवींद्र जडेजाने बकबक करणाऱ्या मॅथ्यू वेडला चिडवताना सुनावले की, ""मित्रा तुम्ही उद्या सामना हरलात की आपण एकत्र जेवण करू''. जडेजाला माजी खेळाडू आणि संघ व्यवस्थापनातील काही महत्त्वाचे लोक मोस्ट व्हॅल्यूएबल खेळाडू म्हणतात. ""मॅन ऑफ दी मॅच पेक्षा मला मोस्ट व्हॅल्यूएबल खेळाडू संबोधलेले कधीही आवडेल. याचा अर्थ संघ माझ्याकडून सतत चांगल्या खेळाची अपेक्षा करते. संघाला गरज असताना चांगला खेळ करायची धमक माझ्यात आहे, असे त्यांना वाटते. हा माझ्या करता समाधानाचा विषय आहे'', जडेजा अभिमानाने म्हणाला.

""तिसऱ्या दिवशीचा खेळ चालू झाला तेव्हा चेंडू नवा होता आणि दडपण आमच्यावर होते. त्यांचे दोन्ही वेगवान गोलंदाज सातत्याने 140च्या पुढच्या वेगाने मारा करत होते. पहिल्याच चेंडूवर मला बाद दिले गेले पण चेंडू माझ्या बॅटला लागला नव्हता. त्यानंतर मी आणि सहाने ठरवले की विकेटवर उभे राहायचे आणि 300 धावांचा टप्पा गाठायचा प्रयत्न करायचा.'' सकाळच्या खेळाबद्दल बोलताना जडेजाने सांगितले, ""32 धावांच्या आघाडीने ऑसी संघावर मोठा आघात केला असणार. त्यांना अपेक्षा होती की ते आघाडी घेतील. पण आम्ही जबाबदारीने फलंदाजी केली''.

गोलंदाजीबद्दल बोलताना जडेजा म्हणाला, "सर्व गोलंदाजांनी फारच अचूक मारा केला. उमेशने डावाच्या सुरुवातीला वॉर्नरला बाद केले. त्यानंतर भुवीने स्मिथची उजवी स्टंप हलवली. हाती आलेली लय आम्ही पकडून ठेवली. फलंदाज सतत दडपणाखाली राहिले तिथेच यशाचे दार उघडले. माझी गोलंदाजी टप्प्यावर पडत आहे, कारण मी इतकी गोलंदाजी केली आहे की आता चेंडू टाकणे "ऑटो मोडमधे गेले आहे'', असे हसत हसत जडेजा बोलत गेला.

...आणि शांतता पसरली : ग्रॅमी हिक (ऑस्ट्रेलियाचा फलंदाज प्रशिक्षक)
पहिल्या डावात भारतीय संघाने 32 धावांची आघाडी घेतली तेंव्हा पासूनच लय भारतीय संघाच्या हाती गेली. दुसऱ्या डावात आमच्या फलंदाजांनी विकेटवर उभे राहायची तयारी ठेवली नाही. 137 धावांमधे सगळे खेळाडू बाद झाले आणि आमच्या ड्रेसिंगरूमधे शांतता पसरली. प्रचंड निराशा सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. माझ्यामते स्मिथ बाद होणे हा मोठा आघात होता. पण मला भारतीय गोलंदाजांचे कौतुक करावेसे वाटते कारण प्रथम त्यांनी बॅटने काम चोख पार पाडताना संघाला आघाडी मिळवून दिली. अचूक भेद गोलंदाजी करून आमच्या फलंदाजांची शिकार केली. क्रिकेटमधे काहीही होऊ शकते, हे मान्य केले तरी आत्ताच्या घडीला भारतीय संघाला विजयापासून रोखणे कठीण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com