बॅडमिंटनपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताचे दहावे सुवर्ण!

वृत्तसंस्था
सोमवार, 9 एप्रिल 2018

नवी दिल्ली : भारताच्या बॅडमिंटनपटूंनी ऐतिहासिक कामगिरी करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज (सोमवार) सुवर्णपदक जिंकले. हे भारताचे यंदाच्या स्पर्धेतील दहावे सुवर्ण आहे. मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने मलेशियावर 3-1 अशी मात केली. 

नवी दिल्ली : भारताच्या बॅडमिंटनपटूंनी ऐतिहासिक कामगिरी करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज (सोमवार) सुवर्णपदक जिंकले. हे भारताचे यंदाच्या स्पर्धेतील दहावे सुवर्ण आहे. मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने मलेशियावर 3-1 अशी मात केली. 

भारताच्या अश्‍विनी पोनप्पा, आर. सात्विक, किदम्बी श्रीकांत आणि साईना नेहवाल यांनी हा विजय साकारला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील हे भारताचे बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीतील पहिलेच सुवर्ण आहे. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने हा विजय साकारला. या संघामधील साईना, श्रीकांत आणि सात्विक हे तिघे गोपीचंद यांचेच शिष्य आहेत. 

मलेशियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सात्विक आणि अश्‍विनी या दोघांनी पेंग स्यून चॅन-ल्यु यिंग गोह या जोडीवर 21-14, 15-21, 21-15 असा विजय मिळविला. त्यानंतर श्रीकांत आणि ली चॅंग वेई यांच्यात लढत झाली. श्रीकांत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर चॅंग वेईने तीन वेळा ऑलिंपिक पदक जिंकले आहे. या लढतीत श्रीकांतने 21-17, 21-14 असा विजय मिळवित भारताची आघाडी 2-0 अशी वाढविली. 

यानंतर सात्विक आणि चिराग शेट्टी या दोघांना पुरुष दुहेरीत व्ही. शेम गोह-वी कियॉंग टॅन या जोडीकडून 15-21, 20-22 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारताला सुवर्ण मिळवून देण्याची जबाबदारी साईनावर आली. साईना सध्या जागतिक क्रमवारीत बाराव्या स्थानी आहे. तिने सोनिया चिह हिच्यावर 21-11, 19-21, 21-9 अशी मात करत भारताच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. 

या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान, स्कॉटलंड, मॉरिशस आणि सिंगापूरवर मात करून भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता. 

Web Title: Team India bags first ever Gold in CWG mixed Badminton