टेनिस क्रमवारीत नदालची घसरण

पीटीआय
मंगळवार, 18 एप्रिल 2017

टेनिस क्रमवारी 
१) अँडी मरे, २) नोव्हाक जोकोविच, ३) स्टॅन वाव्रींका, ४) रॉजर फेडरर, ५) केई निशिकोरी, ६) मिलोस राओनिच, ७) रॅफेल नदाल, ८) मरिन चिलीच, ९) डॉमिनिक थिएम, १०) ज्यो विल्फ्रेड त्सोंगा

पॅरिस - जागतिक टेनिस क्रमवारीत स्पेनचा रॅफेल नदालची घसरण झाली असून, तो पहिल्या पाचातून बाहेर पडला आहे. त्याउलट जपानचा केई निशिकोरी पहिल्या पाचात आला आहे.

नव्याने जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत निशिकोरीचे स्थान दोनने सुधारले असून, तो पाचव्या स्थानावर आला आहे. रॅफेल नदालची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. अँडी मरे अव्वल स्थानावर कायम आहे. निशिकोरीने या आठवड्यात होणाऱ्या माँटे कार्लो मास्टर्स स्पर्धेतून माघार घेतली असून, नदाल या स्पर्धेत दहाव्या विजेतेपदासाठी प्रयत्नशील असेल.