पाकचा उमर अक्‌मलला डच्चू

पीटीआय
मंगळवार, 23 मे 2017

लंडन - पाकिस्तानने आगामी चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी उमर अक्‌मल याला डच्चू दिला. तो तंदुरुस्ती चाचणीत दोन वेळा अपयशी ठरला. त्याने चाचणीच्या वेळी संघ व्यवस्थापनाशी वाद घातला. मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी हे वरिष्ठ पातळीवर कळविले. त्यामुळे त्याला इंग्लंड दौऱ्यावरून परत  बोलाविण्यात येईल. 

सध्या पाक संघाचे सराव शिबिर बर्मिंगहॅममध्ये सुरू आहे. निवड समितीचे अध्यक्ष  इंझमाम उल हक यांनी ही माहिती दिली. बदली खेळाडू म्हणून  हरीस सोहेल किंवा उमर अमीन यांच्यापैकी एकाची निवड होईल.