इंग्लंडच्या बाजारात रोहित विराट करतायत कपड्यांची शॉपिंग, PHOTO व्हायरल

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या धर्तीवर इतिहास घडवण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल.
Virat Kohli, Rohit Sharma
Virat Kohli, Rohit Sharmaesakal

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली इंग्लंडच्या (England) धर्तीवर इतिहास घडवण्यासाठी भारतीय संघ (Indian team) इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. बुधवारी भारतीय संघ इंग्लडच्या दिशेने रवाना झाला होता. १ ते ५ जुलै या कालावधीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी खेळवण्यात येणार आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंडची भ्रमंती करताना दिसत आहे. हिटमॅन रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचे शॉपिग करत असल्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Virat Kohli, Rohit Sharma
IND vs SA: पाचवा टी-20 सामना रद्द होऊ शकतो! जाणून घ्या कारण...

१ ते ५ जुलै या कालावधीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना एजबॅस्टन (Edgbaston) येथे खेळवला जाणार आहे. दरम्यान, खेळाडूंचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात एका चाहत्याने विराट आणि रोहितसोबत सेल्फी फोटो काढले आहेत.

Virat Kohli, Rohit Sharma
Fathers day 2022: 'या' बापलेकांनी गाजवले क्रिकेटचे मैदान, PHOTO

लंडनमध्ये दाखल झाल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा शॉपिंग करण्यासाठी बाहेर पडले. शॉपिंग करताना बाजारात त्यांना एका चाहत्याने पाहिलं. आणि त्यानंतर त्यांच्याभोवती गर्दी झाली. सध्या याच क्षणांचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

भारत आणि इंग्लंडमध्ये पाचवा कसोटी सामना एजबेस्टन येथे 1 ते 5 जुलै दरम्यान खेळला जाणार आहे. कसोटी संपल्यानंतर 7 जुलै ते 17 जुलै दरम्यान भारतीय संघ तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

टीम इंडियाच याच महिन्यात आयर्लंड विरुद्ध दोन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारत आपला दुसरा संघ आयर्लंडला पाठवणार आहे. आयर्लंड दौऱ्यात भारतीय संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्या करणार आहे. भारतीय संघ 24 जूनला लीसेस्टशर विरुद्ध 4 दिवसीय सराव सामना खेळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com