पदकानेच ऑलिंपिकची अखेर व्हावी - योगेश्‍वर

पीटीआय
बुधवार, 6 जुलै 2016

नवी दिल्ली - भारताचा ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर योगेश्‍वर दत्त याने रिओ ऑलिंपिक आपले अखेरचे असेल, असे स्पष्ट करताना पदकानेच ऑलिंपिक कारकिर्दीची अखेर व्हावी, अशी इच्छा त्याने व्यक्त केली.

योगेश्‍वर ६५ किलो वजनी गटातून अखेरच्या ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणार आहे. तो म्हणाला, ‘‘ही माझी चौथी आणि अखेरची ऑलिंपिक स्पर्धा असेल. त्यामुळे मला या स्पर्धेत अविस्मरणीय कामगिरी करायची आहे. सुवर्णपदकासह मायदेशी परतण्याचे माझे स्वप्न आहे.’’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी घेतलेल्या भेटीमुळे योगेश्‍वर भलताच उत्साहीत झाला होता. तो म्हणाला, ‘‘देशाच्या पंतप्रधानांनी जातीने विचारपूस करावी हे निश्‍चितच वेगळेपण आहे.’’