कऱ्हाडला कॉंग्रेस-राष्ट्रवादीची छुपी युती? 

हेमंत पवार - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

कऱ्हाड - जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या वेळी इच्छुकांची संख्या मोठी आहे. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यात नवी राजकीय समिकरणे तयार झाली तर गट-आघाड्या फुटल्या आहेत. त्यामुळे नेत्यांसाठी ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामध्ये मतविभागणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. ती टाळून सत्तेचे संख्याबळ गाठण्यासाठी काही गट, गणांत कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून एकमेकांना मदत होण्यासाठी राजकीय व्यूव्हरचना सुरू असल्याची तालुक्‍यात जोरदार चर्चा सुरू आहे. त्याला कितपत यश येतंय, हे लवकरच समजेल. 

जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तालुक्‍यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत. त्यामुळे सध्या मोहिते-भोसले गटाचे मनोमिलन सोडल्यास प्रत्येक नेते व त्यांचे गट स्वतंत्ररित्या निवडणुकीस सामोरे जात आहेत. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीसाठी सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामध्ये बाजी मारण्यासाठी नेत्यांकडूनही व्यूव्हरचना सुरू आहेत. निवडणुकीसाठी सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची कार्यवाही संपली आहे. गट व गणांतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी अनेकांनी पक्षाच्या व नेत्यांच्या आदेशाचीही वाट न पाहता शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे यावेळी इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. मात्र, त्यामुळे बंडखोरी वाढून मतविभागणीचा फटका बसू नये, यासाठीही नेत्यांकडूनही काही प्रयत्न सुरू आहेत. या निवडणुकीत प्रत्येकाचा स्वतंत्र उमेदवार सध्यातरी आहे. त्यामुळे मोठ्या मताधिक्‍याने उमेदवार निवडून येण्याची शक्‍यता कमी झाली आहे. मात्र, आहे त्यातील जास्तीत मते पदरात पाडून घेण्यासाठीही सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. पंचायत समितीवरील वर्चस्वासाठी अपेक्षित विजयी उमेदवारांचा आकडा गाठण्यासाठी काही गट व गणांत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून एकमेकांना मदत होण्यासाठी राजकीय व्यूव्हरचना तालुक्‍यात सुरू आहे. त्यासाठी दुसऱ्या फळीतील युवा नेत्यांना नेत्यांशी चर्चा घडवून आणण्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. त्याला कितपत यश येतंय, हे लवकरच समजेल. मात्र, त्याची तालुक्‍यात मोठी चर्चा आहे. त्यामुळे त्या निर्णयाबाबत सर्वसामान्यांत उत्सुकता वाढली आहे. 

भाजप-उंडाळकरांची छुपी युती? 

कऱ्हाड तालुक्‍यात उंडाळकर आणि भोसले गटाची मैत्री राजकीय समिकरणे न जुळल्याने संपुष्टात आली. त्यामुळे भोसले गटाने यावेळी पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना मदनराव मोहितेंची साथ मिळाली आहे. मात्र, उंडाळकरांच्या कऱ्हाड तालुका विकास आघाडीने रेठरे बुद्रुकमध्ये उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे त्यांची छुपी युती आहे की काय ? अशी चर्चा तालुक्‍यात सुरू आहे.