चांदोलीत ३ बिबट्यांसह ५५५ वन्य प्राण्यांची नोंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

वारणावती - चांदोलीत ३ बिबट्यांसह ५५५ वन्य प्राण्यांची नोंद झाली आहे. वन्य प्राणी व्यवस्थापनासाठी दरवर्षी करण्यात येणाऱ्या प्रजातीनिहाय प्राणीगणनेचा अहवाल नुकताच वन्यजीव विभागाने जाहीर केला आहे. ३ ते ११ मे दरम्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात प्राणीगणना करण्यात आली होती. 

 या गणनेनुसार प्रकल्प क्षेत्रात ३ बिबटे, १६९ गवे, १६८ रानडुक्कर, २० अस्वल, १७ सांबर, ५ शेकरू, १ गरूड, ५ साळींदर यांसह अन्य प्राणी अशा एकूण ५५५ प्राण्यांची नोंद झाली आहे. दरम्यान, निदर्शनास आलेल्या ३ बिबट्यांपैकी १ बिबट्या गोठणे नियतक्षेत्रात, हेळवाक वनपरिक्षेत्रातील रुंदी व उत्तर व दक्षिण नियतक्षेत्रात प्रत्येकी १ बिबटे आढळले आहेत. उपसंचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे अखत्यारित एकूण ११६५,५७ चौ.कि.मी. क्षेत्र आहे, पैकी ६००:१२ चौ.कि.मी. क्षेत्र कोअर झोन तर ५६५:४५ चौ.कि.मी. क्षेत्र बफर झोनमध्ये येते. दरवर्षी या क्षेत्रात वन्यप्राणी गणना होते. या वर्षीही ३ ते ११ मे दरम्यान ही गणना झाली. यात ६१ गट करण्यात आले होते. मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्‍लेमेंट बेन, उपसंचालक डॉ. विनिता व्यास, कुंडल ॲकॅडमीचे महासंचालक सर्फराज खान यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले होते.

महाराष्ट्र

मुंबई : 'हगलेलं तरंगत' ही आपल्याकडे गावरान म्हण आहे. कितीही खोटं बोलला तरी ते पुढे येणार आहे. सोशल मिडीयात काही लपून राहत नाही....

01.18 PM

मुंबई  - ज्या सोशल मीडियाच्या शिडीवरून भाजपने केंद्र आणि राज्यात सत्ता काबीज केली, तोच सोशल मीडिया भाजपसाठी कर्दनकाळ...

07.52 AM

पुणे - हवेचा दाब कमी झाल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. पुणे-मुंबईसह राज्याच्या...

04.36 AM