80 ग्रामपंचायतींसाठी 27 मे रोजी मतदान

80 ग्रामपंचायतींसाठी 27 मे रोजी मतदान

मुंबई - राज्यातील 14 जिल्ह्यांतील 80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 2 हजार 440 ग्रामपंचायतींमधील 3 हजार 909 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी काल येथे केली.

सहारिया यांनी सांगितले, की जून ते सप्टेंबर 2017 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या अशा एकूण 80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. 5 ते 12 मे 2017 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. सार्वत्रिक निवडणुकांकरिता नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नामनिर्देनपत्रांची 15 मे 2017 रोजी छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 17 मे 2017 पर्यंत राहील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. 27 मे 2017 रोजी मतदान होईल. गडचिरोली जिल्हा वगळता सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत मतदान होईल. केवळ गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते दुपारी 3 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 29 मे 2017 रोजी होईल, असेही सहारिया यांनी सांगितले.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती - ठाणे- 4, पालघर- 26, नाशिक- 4, नगर- 1, पुणे- 22, सातारा- 10, सोलापूर- 4, सांगली- 1, औरंगाबाद- 1, नांदेड- 2, उस्मानाबाद- 1, जालना- 2, वाशीम- 1 व चंद्रपूर- 1. एकूण- 80.

पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती (कंसात रिक्त पदांची संख्या) -ठाणे- 99 (212), पालघर- 66 (132), रायगड- 60 (75), रत्नागिरी- 187 (247), सिंधुदुर्ग- 38 (65), नाशिक- 218 (348), जळगाव- 110 (162), नंदुरबार- 49 (63), पुणे- 359 (603), सातारा- 48 (81), सांगली- 105 (170), कोल्हापूर- 77 (100), औरंगाबाद- 102 (120), नांदेड- 109 (160), उस्मानाबाद- 49 (74), जालना- 73 (86), लातूर- 45 (53), अमरावती- 89 (105), यवतमाळ- 116 (150), बुलडाणा- 72 (88), नागपूर- 46 (84) वर्धा- 63 (87), चंद्रपूर- 46 (80), भंडारा- 60 (103) व गडचिरोली- 154 (451). एकूण- 2440 (3909).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com