मुलीशी मैत्री केल्याच्या रागातून नेरुळमध्ये मुलाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

कोपरखैरणे - विरोध करूनही मुलीशी मैत्री कायम ठेवल्याच्या रागातून पाच जणांनी अल्पवयीन मुलास बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. याप्रकरणी त्या मुलाच्या नातेवाइकांची तत्काळ तक्रार दाखल करून न घेतल्याने दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

नेरुळ येथील स्वप्नील सोनावणे याची परिसरातीलच एका मुलीशी मैत्री होती; परंतु तिच्या घरच्यांचा या मैत्रीला विरोध होता. त्यातून दोन्ही कुटुंबांत तणाव होता. दोघांनी विरोधाला न जुमानता मैत्री कायम ठेवली होती. स्वप्नीलच्या मोबाईलमध्ये असलेला मुलीचा फोटो डिलीट करण्यावरून मुलीच्या नातेवाइकांचे स्वप्नीलशी वाद झाले होते. मंगळवारी सायंकाळी त्यांनी स्वप्नीलला जबरदस्तीने त्यांच्या घरी नेले आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. स्वप्नीलच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुलीचे वडील राजेंद्र नाईक (वय 50), भाऊ सागर (वय 45), साजेश नाईक, दुर्गेश पाटील (वय 22), आशीष ठाकूर (वय 23) यांना मंगळवारीच अटक झाली. दुर्गेश व आशिष सागरचे मित्र आहेत. बुधवारी सायंकाळी याप्रकरणी मुलीची आई मालती नाईक (वय 43) आणि सागरचा मित्र समीर शेख (वय 23) यांनाही अटक झाली.