फळे-भाजीपाला निर्यातीत महाराष्ट्र अव्वल

फळे-भाजीपाला निर्यातीत महाराष्ट्र अव्वल

पुणे - देशाच्या फळे आणि भाजीपाला निर्यातीत महाराष्ट्र अव्वल ठरले आहे. अनेक समस्यांवर तोंड देत राज्यातील शेतकरी व निर्यातदार ही किमया साध्य केली आहे.  

२०१७ अखेर देशातून झालेल्या वार्षिक फळे निर्यातीचा आढावा घेतल्यास तीन हजार ११३ कोटी रुपयांची ३ लाख ५१ हजार ८३३ टन प्रक्रियायुक्त फळे निर्यात झाली आहेत. त्यात राज्याचा वाटा ३४ टक्के असून मुल्य एक हजार ५४ कोटी रुपयांचे आहे. ताज्या फळांच्या निर्यातीत चार लाख ९ हजार ९३८ टनाची निर्यात झाली असून त्याचे मूल्य एक हजार ८५८ कोटी रुपयांचे होते. त्यात एकट्या महाराष्ट्राचा वाटा एक लाख २८ हजार टनाचा होता. 

राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी व निर्यातदारांनी तर देशाच्या फळनिर्यातीला दिशादर्शक असे काम गेल्या दशकभरात उभे केले आहे. २०१६-१७ या एका वर्षात एक हजार ९६० कोटी रुपयांची एक लाख ८७ हजार २८७ कोटी रुपयांची द्राक्षे राज्यातून निर्यात झालेली आहेत. 

‘‘राज्याची वार्षिक आंबा उलाढालदेखील पावणेचारशे कोटी रुपयांची असून डाळिंब निर्यातीचे मूल्यदेखील जवळपास चारशे कोटीच्या आसपास गेली आहे. भाजीपाल्यात देखील सात पिकांच्या निर्यातीत राज्य पहिल्या क्रमांकावर असून त्यात कांदा निर्यात पावणेदोन हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

शासनाच्या प्रोत्साहनाची गरज
देशाच्या फळे आणि भाजीपाला निर्यातीचे प्रतिनिधित्व महाराष्ट्राने करावे म्हणून गेल्या दोन दक्षकांपासून एक मोठी चळवळ सुरू होती. त्यात कष्टकरी शेतकरी, अभ्यासू शास्त्रज्ञ, कृषी विभाग आणि या प्रक्रियेला पाठिंबा देणाऱ्या शासनकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे. निर्यातीचा पाया आता भक्कम झाला असला तरी इमारत अजूनही उभी राहिलेली नाही. त्यासाठी शासनाच्या दीर्घकालीन प्रोत्साहनाची गरज आहे, असे मत अखिल भारतीय फलोत्पादक महासंघाचे अध्यक्ष सोपान कांचन यांनी व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com