दांडपट्ट्यातील कौशल्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची आज (एक ऑगस्ट) जयंती. त्यांचे स्मारक सांगली जिल्ह्यातील क्रांतिभूमी वाळवे तालुक्‍यातील वाटेगाव येथे आहे. जयंतीनिमित्त अण्णा भाऊंचे पुतणे काकासाहेब साठे यांनी जागविलेल्या आठवणी...

‘आरळा’ (ता. शिराळा) येथे नात्यातील एकाचे लग्न होते. अण्णा भाऊ लग्नास हजर होते. या ना त्या निमित्ताने आजूबाजूला पोलिसांचा सतत पहारा असे. भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांना ते शोधत असत. या लग्नातही पोलिस आले. वाटेगावातील दांडपट्ट्याच्या खेळाविषयी ते ऐकून होते. रुबाब झाडायचा म्हणून त्यातल्या एका पोलिसाने धाकवजा चौकशा सुरू केल्या आणि कुणाला जमतोय का रे दांडपट्टा, अशी विचारणा केली. लग्नातील कोणी लवकर तयार होईना. थोड्या वेळाने अण्णा भाऊ पुढे आले आणि आव्हान स्वीकारले. त्यानंतर त्यांनी जो खेळ केला तो पाहून पोलिस थक्क झाले. आम्ही अण्णा भाऊंना ज्या काळात पाहिले त्या काळात त्यांचा लौकिक झाला होता. त्यांची सर्वत्र ओळख तयार झाली होती.

(शब्दांकन - धर्मवीर पाटील)

Web Title: Annabhau Sathe Jayanti