तंटामुक्त गाव योजनेचे स्वरूप बदलणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

शेटफळगढे (जि. पुणे) - महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम आता नव्या स्वरूपात राबविण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. यासाठी पूर्वीच्या योजनेतील उणिवा लक्षात घेऊन नव्याने योजना राबविताना काय बदल करावे लागतील. या व इतर बाबींचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी सरकारने पुण्याच्या यशवंतराव चव्हाण प्रशासन विकास प्रबोधिनीवर (यशदा) टाकली आहे. 

यासंदर्भात यशदाच्या पथकाने नुकतीच तंटामुक्त पुरस्कारप्राप्त म्हसोबावाडी (ता. इंदापूर) गावाला भेट देऊन योजनेबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी पोलिस पाटील तुषार झेंडे, सरपंच स्वाती थोरवे, ग्रामपंचायत सदस्य संदीप चांदगुडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लालासो साळुंखे, लक्ष्मण चांदगुडे, नारायण थोरवे, शेखर मोहिते उपस्थित होते. म्हसोबावाडी गावाने ही योजना यशस्वीरीत्या राबविली आहे. म्हणूनच गतवर्षीदेखील केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या पथकाने गावाला भेट दिली होती. केंद्र सरकारने तंटामुक्त मोहिमेवरील आधारित २० भाषांतील लघुपट तयार करण्यासाठी या गावाच्या कार्याचा आढावा घेतला आहे. तसेच गतवर्षी गावचे पोलिस पाटील तुषार झेंडे यांना केंद्र सरकारने भोपाळ येथे आयोजित केलेल्या संसद आदर्श ग्राम योजनेच्या कार्यशाळेत या योजनेची माहिती देण्यासाठी निमंत्रित केले होते. यात झेंडे यांनी या योजनेचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याने म्हसोबावाडी गावाला व झेंडे यांना केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने प्रथम क्रमांक देत प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविले होते. 

महाराष्ट्रात ही योजना यशस्वीपणे राबविल्यानंतर देशभर ही योजना पोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. म्हणूनच राज्य सरकार ही योजना नव्याने राबविण्यासाठी विचार करीत आहे. 

Web Title: antamukta village to change the nature of the scheme