विधिमंडळाचे ५ डिसेंबरपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ५ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०१६ या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनात विधानसभेतील प्रलंबित दोन विधेयके व विधान परिषदेतील सहा प्रलंबित विधयेकांवर चर्चा होणार असून, चार नवीन आणि ११ प्रख्यापित अध्यादेशांवर चर्चा होणार आहे. 

विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तर विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळात झाली. या वेळी विधानसभेतील बैठकीस विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, संसदीय कार्यमंत्री विजय शिवतारे, विधानसभेतील आमदार अजित पवार, जयंत पाटील, गणपतराव देशमुख, राज पुरोहित, सुनील प्रभू यांच्यासह विधान परिषदेच्या बैठकीस उपसभापती माणिकराव ठाकरे, परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते आदी उपस्थित होते. या बैठकीत विधिमंडळाचे अधिवेशन दोन आठवड्याचे ठेवण्याचे ठरविण्यात आले. पाच डिसेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत विविध विधेयके, शासकीय कामकाजावर चर्चा होणार आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त विशेष चर्चासत्र होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी आज दिली.

Web Title: Assembly winter session in Nagpur from December 5