कोपर्डी गुन्ह्यातील आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

नगर - कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याच्या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींवर शनिवारी दुपारी न्यायालयाच्या आवारात धारदार शस्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.

एका महिला कर्मचाऱ्यासह तीन पोलिस मध्ये पडल्याने आरोपी वाचले. हल्ला करणारे शिवबा संघटनेचे कार्यकर्ते आहेत. ही संघटना जालना जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले. या चार कार्यकर्त्यांकडे धारदार कोयते होते, असे कळते. त्यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोपर्डी खटल्याची सुनावणी सध्या सुरू आहे. त्यासाठी आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांना पोलिसांनी सकाळी न्यायालयात आणले. सुनावणी संपल्यानंतर दुपारी 12.45 वाजता पोलिस आरोपींना वाहनात बसविण्यासाठी घेऊन जात होते. त्याच वेळी अचानक शिवबा संघटनेच्या चार कार्यकर्त्यांनी तिन्ही आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

पोलिस कर्मचारी महेश बोरुडे, रवी टकले व कल्पना आरोडे यांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी या चार कार्यकर्त्यांना पकडून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील हत्यारे जप्त करण्यात आली. पोलिस त्यांची चौकशी करीत आहेत.