मंत्री कार्यालयातच अधिकाऱ्याला बडवले 

beat of Government officer in minister office
beat of Government officer in minister office

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालयात बसून "सेटलमेंट' केल्याचा आरोप असलेल्या लेखाधिकाऱ्याला एका शिक्षण संस्थाचालकाने याच कार्यालयात अक्षरश: बडवल्याचे तीव्र पडसाद मंत्रालयात उमटले आहेत. मंत्री बडोले यांनी हा सगळा प्रकार घडला नसल्याचा दावा केला आहे. संबंधित अधिकाऱ्याने काय केले याच्याशी मंत्री म्हणून आपला कोणताही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका संस्थेला अनुदान मिळवून देण्यासाठी मंत्री कार्यालयात बसणाऱ्या या लेखाधिकाऱ्याने 10 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. मात्र, तीन वर्षे झाले तरी संस्थेला अनुदान मिळत नसल्याच्या संतापातून अरुण निटुरे या संस्थाचालकाने बडोलेंचा पीए असल्याची बतावणी करणाऱ्या या लेखाधिकाऱ्याची मंत्री कार्यालयातच यथेच्छ धुलाई केली. 

हा लेखाधिकारी व मंत्री बडोले यांच्या संबंधांची चौकशी करण्याची मागणीही होत आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, आज मंत्र्याच्या भ्रष्ट पीएला बडवले असेल तर, उद्या मंत्र्यावरही हीच वेळ येऊ शकते. आता लोक मंत्रालयात घुसून मंत्र्यांच्याच दालनात त्यांच्या अधिकाऱ्यांना मारहाण करू लागले आहेत. या सरकारने पारदर्शक कारभाराचे आश्‍वासन दिले होते आणि मंत्रालयात नेमका कसा कारभार सुरू आहे, ते आता अगदी "पारदर्शक' पद्धतीने समोर आले आहे. पैसे घेऊन काम झाले नाही म्हणून चक्क मंत्र्यांच्या दालनात हाणामारी होण्याचा एक आगळावेगळा "पराक्रम' भाजप सरकारच्या नावे नोंदला गेल्याची टीका विखे-पाटील यांनी केली. 

संस्थाचालकाचा दावा 
संस्थाचालकाने माध्यमांसमोर बोलताना या लेखाधिकाऱ्याला दहा लाख रुपये दिल्याचा दावा केला आहे. ही व्यक्ती मंत्री बडोले यांच्या कार्यालयातच पीए म्हणून काम पाहत आहे. तो खरा पीए आहे की वसुली अधिकारी आहे याची चौकशी करावी. त्याने संस्था अनुदानित करण्यासाठी दहा लाख रुपये घेतल्याचे सगळे पुरावे आहेत, असा दावा संस्थाचालकाने केला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com