निपाणी बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद 

राजेंद्र हजारे
बुधवार, 17 जानेवारी 2018

निपाणी - हुतात्मा दिनी बुधवारी (ता. 17) शहर परिसरात हरताळ पाळण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेनेसह मराठी भाषिकांनी केले होते. त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बाजारपेठा बंद होत्या.

निपाणी - हुतात्मा दिनी बुधवारी (ता. 17) शहर परिसरात हरताळ पाळण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेनेसह मराठी भाषिकांनी केले होते. त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बाजारपेठा बंद होत्या. रस्तेही आेस पडले होते. यावेळी हुतात्म्यांना अभिवादनही करण्यात आले. 

1956 मध्ये भाषावार प्रांतरचनेनंतर झालेल्या पोलिस गोळीबारात निपाणीतील कमळाबाई मोहिते व बारवाडमधील गोपाळ चौगुले हे हुतात्मा झाले. सीमालढ्याला बळ आणण्यासाठी यंदाही हुतात्मा दिनी हरताळ पाळण्यात आला. तसेच मराठी भाषिकांतर्फे सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. अशोकनगर, बसस्थानक, साखरवाडी, बसस्थानकासह शहरातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. 

Web Title: Belgaum New Nipani Bandh