प्रजासत्ताक दिन पथसंचलनात बेळगावचे सात विद्यार्थी

प्रजासत्ताक दिन पथसंचलनात बेळगावचे सात विद्यार्थी

बेळगाव - प्रजासत्ताक दिन पथसंचलनात (आरडी परेड) यंदा बेळगाव जिल्ह्यातील सात एनसीसी छात्र कर्नाटकाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. लष्करी शिस्तीचे धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये दाखल झाल्यानंतर आरडी परेडमध्ये सहभाग घेणे मानाचे असते. खडतर प्रशिक्षणानंतर निवड झालेल्या छात्रांना लाल किल्ल्यातील कार्यक्रमात राष्ट्रपतींसमोर पथसंचलन करण्याची संधी मिळते. 

एनसीसीमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येकाला ही संधी मिळत नाही. आरडी परेडसाठी निवड होणे ही केवळ पथसंचलनापुरती मर्यादित बाब नसते. त्या ठिकाणी होणाऱ्या शिबिरात सहभाग घेऊन आपल्यातील कौशल्य दाखविण्याची संधी असते.

26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमानंतर होणाऱ्या पंतप्रधान एनसीसी रॅलीमध्ये खऱ्या अर्थाने आपले कौशल्य दाखवावे लागते. एनसीसीमध्ये मिळालेल्या प्रत्येक प्रशिक्षणाची झलक तेथे दाखवावी लागते. पंतप्रधानांसह संरक्षण मंत्री, तिन्ही दलांचे प्रमुख यावेळी उपस्थित असतात. त्यामुळे अशा छात्रांची एनसीसीमधून निवड करताना छात्रांमधील विशेष गुणांचीही दखल घेतली जाते. चार एनसीसी शिबिरांच्या माध्यमातून छात्रांची अखेरच्या आरडी परेडसाठी निवड होते. 

स्थानिक एनसीसी बटालियन पातळीवर छात्र निवडला जातो. नंतर त्याला बटालियनमध्ये आरडीसाठी प्रशिक्षित केले जाते. पुढे संपूर्ण राज्य स्तरावर इंटर ग्रुप शिबिराचे (आयजीसी) आयोजन केले जाते. राज्यात एनसीसीची सहा मुख्यालये असून बेळगाव मुख्यालयात गोवा राज्याचाही समावेश आहे.

आयजीसीमध्ये सहा मुख्यालयाचे निवडक छात्र सहभागी होतात. यात चार दिवस परेडसंबंधीच्या स्पर्धा आणि चार दिवसांचे प्रशिक्षण असे आठ दिवस शिबिर चालते. यातून उत्कृष्ट छात्रांची निवड करून त्यांना प्री आरडीसी कॅम्पसाठी पाठविले जाते. एकूण तीन शिबिरे चालतात. या तिन्ही शिबिरांद्वारे उत्कृष्ट छात्र निवडून इतर छात्रांना माघारी पाठविले जाते. त्यामुळे केवळ उत्कृष्ट छात्रच दिल्लीपर्यंत पोचतात. यंदा बेळगावातून पाच महाविद्यालयीन छात्र, एक महाविद्यालयीन छात्रा आणि एक विद्यालयीन छात्राने हा मान मिळविला आहे. 

दिल्लीतील लाल किल्ला येथे रोज पहाटे साडेपाच वाजता जानेवारीच्या कडाक्‍याच्या थंडीत सुमारे चौदा किलोमीटरचे पथसंचलन करावे लागते. 26 जानेवारीच्या चार दिवस आधीच पथसंचलनाची रंगीत तालीमही सुरू होते. यासह छात्रांची पीएम रॅलीची तयारीही सुरूच असते. दीर्घ प्रशिक्षणानंतर छात्रांना प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात राष्ट्रपतींसमोर पथसंचलन करण्याचा मान मिळतो. तर पीएम रॅलीत पंतप्रधानांसह तिन्ही सेनादल प्रमुखांसमोर आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळते. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय पातळीवर एका छात्राला बेस्ट कॅडेटचा मान पंतप्रधानांकडून दिला जातो. तर राज्यालाही हा सन्मान प्राप्त होतो. 

बेळगाव जिल्ह्यातून आरडी परेडसाठी निवड झालेले एनसीसी छात्र 

छात्र.........................बटालियन....................दल 

  • मयुर हिरोजी.................25 कर्नाटक...............भूदल 
  • अक्षता चौगुले...............25 कर्नाटक................भूदल 
  • सोनाली बोगार..............26 कर्नाटक................भूदल 
  • महेश अगशिमनी..........8 कर्नाटक स्क्‍वॉड्रन.....वायूदल 
  • सागर डंगराळे..............8 कर्नाटक स्क्‍वॉड्रन......वायूदल 
  • राहुल जोशी.................8 कर्नाटक स्क्‍वॉड्रन.......वायूदल 
  • निरंजन रामनकट्टी........8 कर्नाटक स्कवॉड्रन......वायूदल 
     

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com