बनावट सोने देऊन फसविणाऱ्या तिघांना बेळगावात अटक

संजय सुर्यवंशी
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

बेळगाव -सोने देण्याच्या बहाण्याने रोख रक्कम घेऊन फसविणाऱ्या तिघांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. खरे सोने असल्याचे सांगून बनावट सोने दाखवून ही टोळी रोख रक्कम लुटत होती.

बेळगाव -सोने देण्याच्या बहाण्याने रोख रक्कम घेऊन फसविणाऱ्या तिघांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. खरे सोने असल्याचे सांगून बनावट सोने दाखवून ही टोळी रोख रक्कम लुटत होती. चिक्कोडी व संकेश्वर येथील दोघांना फसविल्याचे उघडकीस आले असून आणखी अनेक जणांची फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

विशाल बायाप्पा पाटील (वय38 ), दिलावरसाब महंमदसाब मुरगी (वय 30, दोघेही रा. वन्नूर  ता. बैलहोंगल ) शिवाप्पा बाळाप्पा उप्पार (वय 59 रा. मुर्कीभावी, ता. बैलहोंगल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत  एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालेमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

Web Title: Belgaum News three arrested in Gold fraud