भाजपने "मुदतपूर्व'ला सामोरे जावे - प्रणिती शिंदे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा आजही कायम असेल, तर भाजपने राज्यात मुदतपूर्व निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान आमदार प्रणिती शिंदे यांनी दिले. 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ""मोदींबाबत पूर्वी तयार झालेले जनमत आता राहिले नसल्याने त्याचा फायदा कॉंग्रेस व इतर पक्षांच्या उमेदवारांना निश्‍चित होईल. भाजपच्या हाती एकहाती सत्ता येईल या उद्देशाने चार सदस्यीय प्रभाग पद्धती आणण्यात आली खरी, मात्र आता परिस्थिती बदलल्याने या निर्णयाचा "बूमरॅंग' भाजपवर होईल.'' 

आम्ही गुंडांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश दिला नाही, असे सांगून त्या म्हणाल्या, ""ज्यांनी शिवसेना सोलापुरात वाढवली, रुजवली ते आज पक्षात आहेत की नाहीत अशी स्थिती आहे. त्यांच्या नेत्याने आपल्या नातेवाइकांनाच संधी दिली. त्यामुळे एकनिष्ठ शिवसैनिक निराश झाले आहेत. मात्र, ते पक्षहित डोळ्यांसमोर ठेवून बोलू शकत नाहीत. या एकनिष्ठांचे दुःख पाहावत नाही.''

Web Title: BJP to face election