'अधीश'प्रकरणी दिलासा नाहीच; राणेंची याचिका हायकोर्टाने फेटाळली

bombay hc dismissed a petition to regularise the illegal construction of adhish bungalow of narayan rane
bombay hc dismissed a petition to regularise the illegal construction of adhish bungalow of narayan rane

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर झालेली आहे, यादरम्यान भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील आधिश बंगल्याबाबतची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे राणे यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. (bombay hc dismissed a petition to regularise the illegal construction of adhish bungalow of narayan rane)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या 'आधीश' बंगल्याचे बेकायदा बांधकाम नियमित करण्यासाठी कालका रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडने केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. एमआरटीपी कायद्याच्या कलम 44 अंतर्गत बेकायदेशीर बांधकाम रेगुलर करण्याचा त्यांचा अर्ज बीएमसीने फेटाळल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे नारायण राणे यांना झटका बसला आहे.

bombay hc dismissed a petition to regularise the illegal construction of adhish bungalow of narayan rane
एकनाथ शिंदे शिवसेनाप्रमुखपदी बसू शकतात का? सेनेच्या घटनेत काय सांगितलंय?

नारायण राणे यांनी अधीश बंगला बांधताना सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमसीझेडएमएकडे तक्रार आली होती. त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हा किनारा क्षेत्र व्यवस्थापन कमिटीने यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या अहवालाच्या आधारे राणे यांना नोटीस बजावली होती. अधीश बंगल्याचे बांधकाम अनधिकृत असल्याचा दावा करीत मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती.

bombay hc dismissed a petition to regularise the illegal construction of adhish bungalow of narayan rane
सरकारचं काय होणार? पवार-ठाकरेंमध्ये 'मातोश्री'वर दोन तास खलबतं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com