कॅशलेस व्यवहारांची तावडेंकडून सुरवात 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

मुंबई - शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कॅशलेस व्यवहाराची सुरवात स्वतःपासून केली आहे. दैनंदिन खर्च भागविण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या बडी ऍप्लिकेशनचा उपयोग ते स्वत: आणि त्यांच्या कार्यालयातील सुमारे 70 अधिकारी आणि कर्मचारी करणार आहेत. 

स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे बडी ऍप्लिकेशन तावडे आणि त्यांच्या आस्थापनेवरील 70 जणांनी डाउनलोड केले आहे. या ऍप्लिकेशनचा जास्तीत जास्त वापर करणाऱ्या व्यक्तीला दर महिन्याला प्रमाणपत्र देऊन तावडे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. याचा वापर मोबाइल बिल, वीज बिल, किराणा सामना बिल भरण्यासाठी उपयोग करता येईल. आगामी काळात शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य आणि अल्पसंख्याक विकास विभागातही संकल्पना राबविण्यात येईल. 

विद्यार्थ्यांसाठी सुविधा 
विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांचे शुल्क, परीक्षा शुल्क भरण्यात आज अनेक अडचणी येत असते. यापुढे मात्र शाळा आणि महाविद्यालयांनी या "ऍप'च्या माध्यमातून शुल्क स्वीकारावे, असा आग्रह करण्यात येईल. तसेच शालेय शिक्षण विभागात सर्वप्रथम याबाबत अंमलबजावणी करण्यात येईल.