शंभरी ओलांडलेल्या आजींचा मतदानात उत्साह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

मोरे यांनी वयाच्या १०६व्या वर्षी देखील मतदानाचा हक्क बजावत नवमतदाराना प्रेरणा देण्याचे काम केले आहे. तसेच मतदान दिवस सुट्टी म्हणून साजरा करणाऱ्यांना हि एक चपराकच म्हणावी लागेल. हौसाबाई मोरे यांची मतदार म्हणून हि १७ वी निवडणूक आहे.

कोल्हापूर - हौसाबाई धोंडीराम मोरे वय १०६ यांनी आज (मंगळवार) आपला मतदानाचा हक्क बजावला. हौसाबाई मोरे या म्हाळुंगे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील रहिवाशी आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी त्यांनी मतदान केले.

मोरे यांनी वयाच्या १०६व्या वर्षी देखील मतदानाचा हक्क बजावत नवमतदाराना प्रेरणा देण्याचे काम केले आहे. तसेच मतदान दिवस सुट्टी म्हणून साजरा करणाऱ्यांना हि एक चपराकच म्हणावी लागेल. हौसाबाई मोरे यांची मतदार म्हणून हि १७ वी निवडणूक आहे.

पुण्यात 96 वर्षांच्या आजीने केले मतदान 
शुक्रवार पेठमधील गाडीखाना येथील मतदान केंद्रात आज सकाळी अंबुबाई विष्णुपंत थोरवे या 96 वर्षाच्या महिलेने मतदानाचा हक्क बजावला. आज सकाळपासूनच पुण्यातील मतदान केंद्रांमध्ये गर्दी आढळून येत होती. मतदानासाठी तरुणांची गर्दी दिसून येत आहे. काही ठिकाणी मतदान यादीत नाव सापडत नसल्याच्या तक्रारीही करण्यात येत आहेत. 

Web Title: Centenarian voters casting votes in Municipal corporation, Zilla Parishad election