सावकारी करणाऱ्या दांपत्याविरुद्ध गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

संगमनेर - कर्ज व व्याजापोटी शेतकऱ्याची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून बेकायदा सावकारी करणाऱ्या दांपत्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सहकार उपनिबंधक कार्यालयातील लिपिकाने याची तक्रार केली. 

सहकार उपनिबंधक कार्यालयातील लिपिक संजय पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी साहेबराव माधव साकुरे व सुगंधा साहेबराव साकुरे (रा. निमज, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. निमज येथील पुरुषोत्तम दिलीप चायल यांनी उपनिबंधक कार्यालयात अर्ज दाखल केला होता. त्याची दखल घेत या कार्यालयाने तक्रार दिली. 

पुरुषोत्तम यांचे वडील दिलीप चायल यांनी शेतजमिनीवर तीन लाख 85 हजार रुपयांच्या बदल्यात पावती गहाणखत स्वरूपाची मुदत खरेदी दिल्याचे कागदपत्रांवरून दिसते. त्यांना दिलेल्या रकमेपोटी ही जमीन गहाण ठेवून घेतल्याचे स्पष्ट होते. त्याच दिवशी गहाण स्वरूपाची मुदत खरेदी दस्तनोंदणी करण्यात आली. सुगंधा साकुरे यांनी चायल यांच्याकडून उसनवार पावती लिहून घेतली. त्यात मुदत खरेदीचे तीन लाख 85 हजार व उसनवार पावतीचे एक लाख 65 हजार रुपये सुगंधा साकुरे यांना द्यायचे, असे नमूद केले आहे. त्यामुळे मुदत खरेदी खताद्वारे पाच लाख 50 हजार रुपयांचा व्यवहार शक्‍य असताना वेगळी उसनवार पावती करून साकुरे यांचा व्याजाची रक्कम वसूल करण्याचा उद्देश दिसून येतो, असे तक्रारीत म्हटले आहे.