सिटी सर्व्हे अधिकाऱ्यावर कारवाई होणार - पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 26 मार्च 2017

मुंबई - वांद्रे पूर्व येथील पुनर्विकासाच्या प्रकल्पात म्हाडाचे नाव "प्रॉपर्टी कार्ड'वर लावण्यासाठी एक कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या सिटी सर्व्हे अधिकारी चंद्रकांत शिंदे यांच्यावर आठ दिवसांत कारवाई करण्यात येईल; तसेच प्रलंबित "एनए टॅक्‍स'वरील दंडात्मक रक्कम रद्द करण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी विधानसभेत जाहीर केले.

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी हा भ्रष्टाचार विधानसभेत मांडला होता. आज विधानसभेत अर्थसंकल्पावर विभागवार चर्चा करण्यात आली. या चर्चेत भाग घेताना शेलार यांनी विविध विषयांवर सरकारचे लक्ष वेधले. त्यामध्ये वांद्रे पूर्व येथील म्हाडाच्या जमिनीवरील पुनर्विकासाच्या प्रकल्पामध्ये त्या प्रकल्पाच्या "प्रॉपर्टी कार्ड'वर म्हाडाचेच नाव लावण्यासाठी संबंधितांकडे सिटी सर्व्हे ऑफिसर चंद्रकांत शिंदे यांनी एक कोटींची मागणी केल्याची गंभीर बाब आमदार त्यांनी उघड केली. त्याची सरकारने तातडीने दखल घेतली.