वाईत डॉक्‍टरांना जमावाची मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

वाई - विष प्राशन केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे 15 ते 20 जणांच्या जमावाने येथील एका खासगी रुग्णालयातील तीन डॉक्‍टरांना मारहाण केली. मात्र, या प्रकाराची कोणतीही नोंद पोलिस ठाण्यात झाली नव्हती. 

वाई - विष प्राशन केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे 15 ते 20 जणांच्या जमावाने येथील एका खासगी रुग्णालयातील तीन डॉक्‍टरांना मारहाण केली. मात्र, या प्रकाराची कोणतीही नोंद पोलिस ठाण्यात झाली नव्हती. 

मूळच्या शेंदूरजणे येथील एका युवकाने विष प्यायल्यामुळे त्याला नातेवाईकांनी वाईतील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, तेथे डॉक्‍टर उपलब्ध नसल्यामुळे त्याला सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करावे, असे सांगण्यात आले. मात्र, नातेवाईकांनी वाईतीलच एका खासगी रुग्णालयात त्याला दाखल केले. तेथील डॉक्‍टरांनी त्याच्यावर उपचारही केले. मात्र, काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच संबंधित व्यक्तीचे मित्र व इतर नातेवाईक रुग्णालयात आले. चिडून त्यांनी रुग्णालयातील तीन डॉक्‍टरांना मारहाण केली. घटनेची माहिती कळताच तेथे पोलिसही आले. पोलिसांनी त्या जमावाला शांत केले. त्यांच्यातील वाद तडजोडीने मिटविला. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झालेली नव्हती. 

Web Title: The crowd assaulted the doctor in wai