2 हुतात्म्यांची पार्थिवं नागपूरला रवाना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

नागपूर : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात CRPF च्या हुतात्मा झालेल्या दोन जवानांची पार्थिवं नागपूर विमानतळावर आज (रविवार) सकाळी आणण्यात आली. त्यानंतर ही पार्थिवं अंत्यसंस्कारांसाठी पुढे त्यांच्या गावी रवाना करण्यात आली. 

यामध्ये वर्धा जिल्ह्यातील हुतात्मा हेड काँस्टेबल प्रेमदास मेंढे, तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील हुतात्मा काँस्टेबल नंदकुमार आत्राम यांचा समावेश आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलातील हुतात्मा जवानांच्या पार्थिवावर आज सकाळी पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मा जवानांना श्रध्दांजली अर्पण केली.

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी अचानकपणे केलेल्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) 12 जवान हुतात्मा झाले, तर 5 जवान जखमी झाले.

माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या सुकमा जिल्हयातील भेज्जीच्या जंगलात शनिवारी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास कोटाचेरू नावाच्या खेड्याजवळ ही घटना घडली. भेज्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे जंगल आहे. जंगलात जाणारा रस्ता सुरू करण्यासाठी CRPF च्या 219 बटालियनचे गस्त पथक गेले असताना जवानांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.