शिवसेना व भाजपची लढाई फक्‍त देण्या-घेण्याची लढाई 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

मुंबई - शिवसेना आणि भाजप मुंबई महानगरपालिकेसह केंद्र व राज्य सरकारमध्ये सत्तेत असून परस्परांवर करत असलेले आरोप आश्‍चर्यकारक आहेत. गेली 25 वर्षे दोन्ही पक्ष मुंबई महानगरपालिकेत सत्तेत आहेत म्हणूनच ही लढाई वैचारिक नसून, फक्त देण्या-घेण्याची आणि लुटीमध्ये किती हिस्सा मिळावा यासाठीच आहे, अशी टीका कॉंग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी शुक्रवारी केली. 

पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर म्हणत असतील की शिवसेना ही हफ्ताखोर पार्टी आहे, तर त्यांनी शिवसेनेवर "एफआयआर' दाखल करावा, असे आवाहनही त्यांनी केले. ""शिवसेना आणि भाजपने मिळून मुंबई महानगरपालिकेत फक्त भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केले आहेत. त्या लुटीमध्ये कोणाला किती हिस्सा मिळावा, यासाठीच हे भांडत आहेत. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन हे दोघे भांडत आहेत, हे खूपच आश्‍चर्यकारक आहे. मुंबईकरांनी यापासून सावध झाले पाहिजे. कॉंग्रेस मुंबईत सर्व वार्डांत निवडणूक लढवीत आहे. मुंबईकरांनी कॉंग्रेसला एक हाती सत्ता दिली तर पारदर्शक कारभार कसा असतो व मुंबईचा विकास कसा करायचा असतो, हे आम्ही दाखवून देऊ.'' 

मुंबईत मला सगळीकडे देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे होर्डिंगवर दिसत आहेत, याचाच अर्थ असा आहे की, नोटाबंदीमुळे लोक नाराज झालेले आहेत हे भाजपला कळाले आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होर्डिंगवरून बाजूला केलेले आहे, असेही ते म्हणाले. 
 
महाराष्ट्र

मुंबई - राज्य सरकारच्या विक्रीकर विभागातल्या कामगिरीवर महालेखापालांनी (कॅग) अनेक प्रकरणांत नाराजी व्यक्‍त केलेली असतानाच...

05.03 AM

मुंबई - राज्यातील बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यास उच्च न्यायालयाने आज पुन्हा मनाई केली. बैलांना शर्यतीदरम्यान इजा होणार...

03.57 AM

मुंबई - देश बलशाली बनवण्यासाठी सर्वांनी दुष्काळापासून मुक्ती, शेतकऱ्यांना कर्जापासून मुक्ती, समाजाला प्रदूषणापासून मुक्ती,...

03.03 AM