सामाजिक न्यायमंत्र्यांकडून मुक्ता टिळक यांचे समर्थन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

नगर - आरक्षणाबाबत पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. कोणालाही त्रास होईल, असे टिळक बोललेल्या नाहीत. त्यांनी कायम आरक्षणाचे समर्थनच केले आहे, अशी भूमिका सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी घेतली. 

सावेडी बस स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन मंत्री कांबळे यांच्या हस्ते आज झाले. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ""मागासवर्गीय महिला बचत गटांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनामध्ये आठवडे बाजार सुरू केला जाईल. तेथून गोरगरिबांना न्याय देण्याचे काम करू. सामाजिक न्यायभवनामधून दलित, पीडितांसाठी चांगले काम होईल. डॉ. आंबेडकर यांनी समतेचा लढा दिला, म्हणून गोरगरिबांना न्याय मिळत आहे. इमारतीचे काम दर्जेदार करा. त्यात त्रुटी आढळल्यास निधी देणार नाही. इमारतीत महामंडळासह अन्य सात विभागांची कार्यालये असतील.''