अभियांत्रिकी, औषधनिर्माण अभ्यासक्रमाच्या जागा दुप्पट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

मुंबई - अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण अभ्यासक्रमातील जागा जवळपास दुप्पट करण्यात आल्या आहेत. उच्च तंत्र शिक्षण विभागाने मंगळवारी (ता. 16) याविषयीचा आदेश काढला. 

मुंबई - अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण अभ्यासक्रमातील जागा जवळपास दुप्पट करण्यात आल्या आहेत. उच्च तंत्र शिक्षण विभागाने मंगळवारी (ता. 16) याविषयीचा आदेश काढला. 

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडून परवानगी देण्यात आलेल्या राज्यातील अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविद्यालयांतील प्रवेशक्षमता 50 वरून 100 वर गेली आहे. 60 जागा असलेल्या महाविद्यालयांतील संख्या वाढून 120 झाली आहे. या वाढीव जागेचा प्रस्ताव अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे सादर करण्यात आला होता. वाढीव क्षमता दिलेल्या महाविद्यालयांत शिक्षक, ग्रंथालय, प्रयोगशाळा इत्यादी सोयीसुविधा देणेही बंधनकारक राहील.