पर्यावरणपूरक इंधनाने प्रदूषण रोखता येईल 

पर्यावरणपूरक इंधनाने प्रदूषण रोखता येईल 

मुंबई - राज्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन (क्‍लीन फ्युएल) वापरले जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखता येणार आहे. विकासासह पर्यावरण संवर्धनही शक्‍य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या 9 व्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन बिडिंग राउंड निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, की आज होणाऱ्या बिडिंग राउंड्‌सचा फायदा राज्याला मिळणार आहे. आतापर्यंत राज्यात सहा शहरांत सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र उपलब्ध होते, आता नऊ शहरांत ही केंद्रे आल्यानंतर राज्यात एकूण 15 जिल्ह्यांत नॅचरल गॅस उपलब्ध होणार आहे. याचा लाभ 56 लाख घरांना आणि सुमारे दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे क्‍लीन एनर्जीचे स्वप्न पूर्ण करण्यास यामुळे हातभार लागणार आहे. 

समृद्धी महामार्गालगत गॅस पाइप लाइन टाकण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावामुळे या प्रकल्पाचे महत्त्व अधिक अधोरेखित होणार आहे. दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचेही काम पूर्ण झाले असून स्टील हब, कोल्ड चेन यांसारखे प्रकल्प उभे राहत आहेत. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com